♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मातृशक्ती सक्षम करण्यासाठी विविध योजनांची अंमलबजावणी – केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार. चिखली येथील ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन व गरोदर माता आरोग्य तपासणी शिबिर

MH 28 News Live, चिखली : मातृत्व हे स्त्रीला लाभलेलेवरदान आहे. त्यामुळे गरोदर माता व स्तनदा मातांची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागसजगतेने काम करीत आहे. देशातील ही मातृशक्ती सक्षम करण्यासाठी शासन पातळीवरून विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येत असून त्याचा निश्चितच लाभ मातांना होतअसल्याचा विश्वास केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी आज व्यक्त केला.

चिखली येथील मुकूल वासनिक सांस्कृतिक भवन येथे गरोदर मातातपासणी शिबिर व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राज्यमंत्री डॉ. पवारबोलत होत्या. यावेळी आमदार श्वेताताई महाले, आमदार ॲड आकाश फुंडकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एन एम राठोड आदींसह मान्यवरउपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरूवातीला 1 कोटी रूपये खर्चकरून निर्मित केलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन राज्यमंत्री डॉ. पवारयांच्याहस्ते करण्यात आले. तसेच चिखली मतदार संघातील जलजीवन मिशन, केंद्रीय मार्गनिधी, पंतप्रधान ग्राम सडक योजनेतंर्गत होणाऱ्या 42.12 कोटी रूपयांच्या विविधविकास कामांचे भूमीपुजन कार्यक्रमस्थळी करण्यात आले. गरोदर मातांनी नियमित आरोग्य तपासणी करण्याचेआवाहन करीत केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार म्हणाल्या, गरोदर मातांच्या तपासणीचाखर्च व औषधे पुरविण्यासाठी केंद्र शासन प्रधानमंत्री मातृवंदन योजना राबविते. यामध्येशासन अर्थसहाय करते. तसेच जननी सुरक्षा योजना, बाल सुरक्षा योजना, आयुष्यमान भारत,पंतप्रधान जनआरोग्य योजना राबविते. आयुष्यमान भारत योजनेसाठी लाभार्थी चिन्हीतकरण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना वर्षाला पाच लक्ष रूपयांचे आरोग्य विमा कवचदेण्यात येते. त्यामुळे आरोग्यावरील खर्च लाभार्थ्याला करण्याची गरज पडत नाही. पॅनलवरील रूग्णालयातून उपचार करण्यात येतात. जनऔषधी केंद्रांच्या माध्यमातून औषधांवरीलखर्चही कमी करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे. देशात 12 वर्षापुढील बालकांनाही लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तरी सर्व पात्र लाभार्थ्यांनी लसीकरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार श्वेताताई महाले यावेळी म्हणाल्या, चिखली येथील रूग्णालय 50 बेडचे असून ते 100 बेड करण्यात यावे. तसेच चिखली येथे ट्रामाकेअर सेंटर सुरू करण्यात यावे. उंद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून अद्ययावत करावे. तालुक्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याचे काम करण्यात येत आहे. तसेच आमदार ॲड आकाश फुंडकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. पंडीत देशमुख यांनीसुद्धा आपले विचार यावेळी व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राठोड यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी गरोदर माता तपासणी शिबिर आयोजना मागील भूमिका विषद केली. शिबिरात गरोदर मातांची तपासणी करण्यात येवून त्यांना औषधे देण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी, डॉक्टर्स, परीसरातील गरोदर मातांची उपस्थिती होती.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button
स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129