♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार यांनी साधला डॉक्टरांशी संवाद

MH 28 News Live, चिखली : केंद्रीय आरोग्य तथा कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांचा डॉक्टरांसोबत सुसंवाद साधण्याकरिता गुप्ता गार्डन येथे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी आ.श्वेताताई महाले, विद्याधर महाले, डॉ. आशुतोष गुप्ता, डॉ. नितीन तडस (जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. राजेंद्र वाघ, डॉ.सुहास खेडेकर, डॉ. सुहास तायडे, डॉ. प्रतापसिंह राजपूत, डॉ. विश्वनाथजी यादव, डॉ.प्रकाशजी शिंगणे, डॉ. प्रतापसिंह परिहार, डॉ.भूषण डागा व चिखलीतील प्रतिष्ठित डॉक्टर वर्ग उपस्थित होते.

यावेळी आ.श्वेताताई महाले यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलताना डॉ. आशुतोषजी गुप्ता म्हणाले, सध्या भारतामध्ये डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले होत आहेत, डॉक्टरांवर हल्ले करूनही गुन्हेगार जामिनावर लवकर सुटतो त्यामुळे गुन्हेगारांना कशाचीसुद्धा भीती राहिलेली नाही व डॉक्टरांवर खोटे गुन्हे दाखल होत आहे त्यामुळे गुन्हेगारांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्याकडे केली आहे. यावेळी उपस्थित डॉक्टरांनी डॉ.सौ. भारतीताई पवार यांच्याकडे वैद्यकीय सेवेतील अडचणी, वैद्यकीय शिक्षणातील अडचणी व्यक्त केल्या व बुलढाण्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे अशी इच्छा व्यक्त केली. यावर डाँ. भारतीताई पवार यांनी वैद्यकीय सेवेतील अडचणी, वैद्यकीय शिक्षणातील अडचणी सोडवू व बुलढाण्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी डॉ. आशुतोषजी गुप्ता यांनी केंद्रीय राज्यमंत्री डॉ.सौ.भारतीताई पवार ह्या अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल व उपस्थित डॉक्टरांना मार्गदर्शन केल्याबद्दल आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129