
2 लाखांच्या भव्य बक्षिसांची जंगी लुट… चिखली येथे 8 मे रोजी भव्य शंकर पटाचे आयोजन माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त केले आयोजन
MH 28 News Live, चिखली: राजकीय, सामाजीक व धार्मिक क्षेत्राच्या माध्यमातुन आपल्या विविधांगी कार्याचा ठसा सर्वसामान्य जनतेच्या मनावर बिंबविणारे बुलडाणा जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांचा 8 मे रोजी वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली शहर कॉग्रेसच्या वतीने मोठया थाटामाटात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या 8 व 9 मे रोजी खामगांव चौफुली परीसरातील प्रांगणात ‘‘भव्य शंकर पटाचे’’ आयोजन करण्यात आले आहे. या शंकर पटाकरीता तब्बल 2 लाख रूपयांच्या बक्षिसांची जंगी लुट होणार आहे.
जनसेवेसह रूग्णसेवेचा वसा घेतलेल्या माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी चिखली विधानसभा मतदार संघाचा शहर व ग्रामीण भागात विविधांगी विकास केलेला आहे. त्यांच्या कल्पक दुरदृष्टीतुन सामाजिक व राजकीय कार्याने प्रेरीत झालेल्या त्यांच्या समर्थंकांची मोठी फळी निर्माण झाली आहे. चिखली शहर कॉग्रस कमिटीच्या वतीने 8 व 9 मे रोजी भव्य शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. यात जनरल गट व गावगाडा गट असे दोन गट पाडण्यात आले असुन जनरल गटात अनुक्रमे प्रथम बक्षिस 41 हजार रूपये, व्दितीय 21 हजार रूपये, तृतिय बक्षिस 15 हजार प्रोत्साहनपर 11 हजार व 7500 रूपये अशी एकूण 13 बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे. गावगाडा गटात प्रथम बक्षीस 7 हजार, व्दितीय 5 हजार, तृतिय बक्षिस 3 हजार अषी एकुण 13 बक्षिसे जाहीर करण्यात आली आहे. याप्रसंगी घडीवाले राजू मनदाडे, रणजित राठोड, गणेश पळशिकर, दाभाडे मामा, कुंडकर मामा, यांची पर्यवेक्षक म्हणुन उपस्थिती राहणार आहे. या शंकरपटात सहभागी होणा-या तसेच मुक्कामी येणा-या बैलगाडा मालकांची भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. सदर शंकरपटाकरीता रफिकसेठ कुरेशी, विजय गाडेकर, सुरेंद्र ठाकुर, आशिष बोंद्रे, शहजादअली खान यांचे विषेश सहकार्य लाभत आहे. चिखली शहर कॉग्रेस कमिटीव्दारा आयोजित या भव्य शंकरपटाचे नियोजन जिल्हा परिषद सदस्य शरद हाडे तथा मित्र मंडळ सवणा यांच्या वतीने करण्यात आले आहे. तरी बुलडाणा जिहा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या शंकरपट प्रसंगी जिल्हयासह परीसरातील बैलगाडा शर्यत प्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.