चिखली पोलीसांचे असामाजीक तत्वांवर व समाजकंटकावर प्रतिबंधक कार्यवाही ७८ इसमांना केले तात्पुरते तडीपार, सोशल मिडीयावरही बारकाईने लक्ष
MH 28 News Live, चिखली : रमजान ईद, परशुराम जयंती, बसवेश्वर जयंती तसेच विविध पक्षाचे आंदोलने पाहता आगामी काळात कायदा व सुव्यवस्था आबाचीत रहावी करीता पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांनी मागील काळात तणाव निर्माण करणारे, वारंवार गुन्हे करणारे तसेच सन उत्सवाचा फायदा उचलून सार्वजनिक शांतता भंग करणारे ७८ इसमांविरुध कलम १४४ (२) जाफी अन्वये पोलीस स्टेशन चिखली हद्दीतुन तात्पुरते तडीपार कार्यवाही करणेबाबत उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांचेकडे प्रस्ताव तयार करून पाठविले. त्यावरुन उपविभागीय अधिकारी बुलडाणा यांनी सदर प्रस्ताव मंजूर करून नमूद ७८ इसमांना दिनांक ०३.०५.२०२२ व ०४.०५.२०२२ असे २ दिवस पोलीस स्टेशन चिखली हद्दीतून तात्पुरते तडीपार आदेश पारीत केले आहे.
सदर तडीपार करण्यात आलेले लोक चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळुन आल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करुन कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. काही समाजकंटका कडुन Whatsapp / Facebook/Twitter / Insragram / Telegram इत्यादी तत्सम मॅसेजींग अप्लीकेशन माध्यमाव्दारे आक्षेपार्ह फोटो, मॅसेज, व्हिडीओ क्लीप प्रसारीत केल्या जात आहेत. या संबंधाने चिखली शहर व परीसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहुन शातंता कायम टिकून रहावी याकरीता ग्रुपचे अॅडमीन यांनासुध्दा पोलीसांनी कलम १४९ जाफ़ी प्रमाणे नोटीस दिली आहे. सोशल मिडीयावर लक्ष ठेचण्यासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली असून आक्षेपार्ह पोस्ट प्रसारीत करणा-यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button