♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

श्री परशुराम जन्मोत्सवानिमित्त चिखलीत निघाली भव्य शोभायात्रा

MH 28 News Live : चिखली : समस्त ब्राह्मण समाजाचे आराध्य दैवत राजराजेश्वर भगवान श्री परशुराम यांच्या यांचा जन्मोत्सव चिखली शहरात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्त भगवान श्री परशुराम जन्मोत्सव समितीतर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या शोभायात्रेचे ठिकाणी उस्फुर्त स्वागत झाले.

श्री परशुराम जयंतीनिमित्त पहाटे पाच वाजता श्री रेणुकादेवी मंदिरात भगवान परशुराम मूर्तीस अभिषेक करण्यात आला, त्यानंतर सकाळी नऊ वाजता ब्राह्मण समाज विकास बहुउद्देशीय संस्थेद्वारे बांधण्यात येणाऱ्या संकल्पित श्री परशुराम भवनाचे भूमिपूजन आमदार श्वेताताई महाले व प्रतिथयश बांधकाम व्यवसायिक पद्माकर दंडे यांच्या हस्ते संपन्न झाले. सायंकाळी सहा वाजता आदर्श विद्यालय जवळील श्रीराम मंदिरापासून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला जुने गाव गणपती मंदिर, चिंच परिसर, सिमेंट रोड, जयस्तंभ चौक, छत्रपती शिवाजी
महाराज पुतळा पुन्हा जयस्तंभ चौक, राजा टावर परिसरमार्गे या मिरवणुकीचा समारोप रेणुकादेवी मंदिराजवळील श्री बालाजी मंदिरात झाला. यावेळेस महाआरती होऊन प्रसादाचे वितरण करण्यात आले. शोभायात्रेदरम्यान भगवान परशुराम जन्मोत्सव समितीच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज व आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

शोभायात्रचे झाले उत्स्फूर्त स्वागत

या शोभायात्रेचे चिखलीकरांनी ठिकाणी उस्फुर्त स्वागत केले. शोभायात्रेच्या मार्गावर सडा रांगोळ्या काढून सुवासिनींनी भगवान परशुरामाच्या मूर्तीच्या औक्षण केले. ब्राह्मण युवा मंच व वक्रतुंड प्रतिष्ठान आणि श्री गणपती संस्थान तसेच श्री गणपती संस्थानतर्फे शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. जागोजागी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली.

माजी आमदार राहुल बोंद्रे, चिखली अर्बन बँकेच्या वतीने अध्यक्ष सतीश गुप्त, ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे, माजी नगराध्यक्षा विमलताई देव्हडे, नगरसेवक गोविंद देव्हडे, भाजपा शहराध्यक्ष व श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडितराव देशमुख, महात्मा बसवेश्वर सहकारी पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष शैलेश अय्या, जाई वाणी समाजाचे अध्यक्ष गोपाल शेटे, माजली नगरसेवक सचिन बोंद्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक काशिनाथ बोंद्रे व कुणाल बोंद्रे रामदेव इण्डेनचे संचालक शैलेश बाहेती, दिनेश जायलवाल, भाजपा नेते सुरेशआप्पा खबुतरे, डॉ. प्रतापसिंह राजपूत, दिलीप डागा आदींनी भगवान परशुरामांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन केले. चिखली अर्बन बँक, बालाजी अर्बन पतसंस्था, बसवेश्वर अर्बन पतसंस्था, शर्मा परिवार, जोशी परिवार, खंडेलवाल परिवार यांच्या वतीने पाणी, सरबत आणि शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती.

महाराष्ट्र ब्राह्मण सभा, खाण्डल विप्र संघटना, गौड ब्राह्मण संघटना, दधीच ब्राह्मण संघटना, पारिक ब्राह्मण संघटना, लाड ब्राह्मण परिषद आदी सर्वशाखीय बहुभाषिक ब्राह्मण समाजातील महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129