♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

शंकरपटाचे बक्षिस वितरण व कृउबासच्या उपबाजाराच्या उद्घाटनास राज्याचे क्रिडा मंत्री सुनिलजी केंदार 9 मे ला चिखलीत. निमित्त राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसाचे

MH 28 News Live, चिखली : जिल्हा कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या वाढदिवसानिमित्त येत्या 8 व 9 मे रोजी भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे. या शंकरपटाकरीता तब्बल 2 लाख रूपयांच्या भव्य बक्षिसांची जंगी लुट होणार असुन या शंकरपटाचे बक्षिस वितरणाकरीता राज्याचे क्रिडा मंत्री नामदार सुनिल केदार 9 मे रोजी चिखली येणार आहेत. याच दिवशी त्यांच्या हस्ते कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपबाजाराचे उद्घाटन सुध्दा होणार आहे. या प्रसंगी विविध विविध मान्यवरांची उपस्थिीती राहणार असुन पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला मोठया संख्येने राहावे असे आवाहन चिखली शहर कॉग्रेसचे वतीने करण्यात आले आहे.

जनसेवेचा वसा घेतलेल्या माजी आमदार राहुलभाउ बोंद्रे यांनी चिखली विधानसभा मतदार संघात आपल्या कार्यकाळात व आजमीतीसही विकास कामांचा झंझावात अविरपणे सुरूच ठेवलेला आहे. त्यांच्या कल्पक दुरदृष्टीतुन सामाजिक व राजकीय कार्याने प्रेरीत झालेल्या त्यांच्या समर्थंकांची त्यांना समर्थ साथ मिळत आहे. चिखली शहर कॉग्रेसच्या वतीने 8 व 9 मे रोजी भव्य शंकर पटाचे आयोजन करण्यात आले आहे. या शंकरपटाचे उद्घाटन दि. 8 मे रोजी सकाळी 9 वाजता आमदार अमित झनक यांच्या हस्ते जिल्हा सहकारी बॅंकेच्या मागील भव्य पटांगनात होेत आहे. 2 लाख रूपयाच्या बक्षिसांची जंगी लुट होणार असुन सायंकाळी 5 वाजता या बक्षिस वितरण संमारंभाला राज्याचे क्रिडा मंत्री नामदार सुनिल केदार हे उपस्थिीत राहणार आहेत. याच दिवशी चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत नव्याने प्रारंभ होणा-या चिखली एम. आय. डी. सी. स्थित उपबाजाराचे उद्घाटन देखील याप्रसंगी नामदार सुनिल केदार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तरी उपरोक्त दोन्हीही कार्यक्रम प्रसंगी शंकरपट प्रेंमी, शेतकरी, शेतमजुर व नागरीकांनी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन चिखली शहर कॉग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129