चिखलीतील मशिदीवरील भोंगे पहाटेच्या अजान प्रसंगी शांत, राज ठाकरेंच्या भूमिकेचा दिसून आला परिणाम
MH 28 News Live, चिखली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपुर्ण देशात व महाराष्ट्रात ज्या मशिदीमध्ये भोंग्यावर दिवसातून पाच वेळ अजान, नमाज सुरु असेल त्या मशिदीसमोर हनुमान चालिसा दुप्पट आवाजात वाजवा असे आदेश दिले होते. या भूमिकेचा योग्य तो परिणाम चिखली शहरात दिसून आला. येथील मशिदीवरील भोंगे पहाटेच्या अजान प्रसंगी बंद होते.
चिखली शहरांतील जूनेगांव काझी मशिद समोर असलेल्या मारोती संस्थान येथे व शहरातील इतर ३,४ मशिदी समोर हनुमान चालिसा वाजविण्यासाठी पहाटे ५ वाजेपासून मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. परंतु शहरातील प्रत्येक मशिदीमध्ये स्थानिक मुस्लिम समाज बांधवानी सामंजस्याची भूमिका घेऊन पहाटेची अजान जाहीरपणे भोंग्यावर वाजवली नाही. सामंजस्याची भूमिका घेऊन शहरातील हिन्दू मुस्लिम समजा मध्ये असलेला भाईचारा दाखवल्या बद्दल शहरातील सर्व मुस्लिम बांधवांचे व पोलीस निरीक्षक अशोक लांडे व त्याच्या सर्व कर्मचारी याचे अभिनंदन. अश्याच प्रकारे दिवसभर होणारी आपली नमाज, प्रार्थना आतल्या आत म्हणून हीच पध्दत या पुढे ही अमलात आणाल अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांनी व्यक्त केली. एव्हढेच नव्हे तर चिखली शहारातील एकाही मस्जिदीवर पहाटेची आजान भोंग्यावर वाजली नाही. राज ठाकरे यांच्या मागणीला आपण मुस्लिम बांधवानी जो प्रतिसाद दिला त्या बद्द्ल व पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, शेतकरी सेलचे जिल्हा संघटक शैलेश गोंधणे यांनी मनस्वी आभार मानले.
आजच्या या हनुमान चालीसा पठण कार्यक्रमा प्रसंगी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार,शेतकरी सेलचे जिल्हा संघटक शैलेश गोंधणे, तालुका अध्यक्ष विनोद खरपास,शेतकरी सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, तालुका सचिव प्रवीण देशमुख, उपतालुका अध्यक्ष संदीप नरवाडे, शहर उपाध्यक्ष रवी वानखेडे, विभाग अध्यक्ष बंटी कळमकर, मंगेश उगले यांसह मंदिराचे पुजारी पप्पू महाराज गुळवे, अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button