
नवेदित खेळाडूंनी लोणार तालुक्याचा नावलौकिक वाढवावा – पंकज मापारी
MH 28 News Live, लोणार नवोदित खेळाडूंनी आपल्या खेळाच्या जोरावर लोणार तालुक्याचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन लोणार येथील युवा उद्योजक पंकज वसंतराव मापारी यांनी तारांगण स्पोर्टस अकॅडमी द्वारे विविध खेळ ( कराटे, स्केटिंग, डान्स, बुद्धिबळ, सुंदर हस्ताक्षर)प्रशिक्षणाच्या शिबिराचे उद्घाटन प्रसंगी केले.
शिबिराचे उद्घाटन नगराध्यक्षा पुनम पाटोळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोणार पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहेर व मनीष पाटोळे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या वेळी ॲड. सुजित मोरे व प्रा. प्रशांत देशमुख यांनी नटराजाच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण केला. विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर विविध प्रकारचे खेळ स्वरक्षणासाठी कराटे बुद्धी बळासारखे खेळ खेळावे आपल्या मनासोबत शरीर स्फूर्तीदायक राहते मैदानी खेळाने शरीर सुदृढ राहते करिता विद्यार्थ्यांनी हा छंद सुद्धा जोपासावा असे याप्रसंगी युवा उद्योजक पंकज मापारी यांनी सांगितले. यावेळी अखिल नटराजन अंतर संस्कृती संघ नागपूर द्वारा आंतरराष्ट्रीय डान्स स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत लोणारच्या संघाने सहभाग घेतला होता. त्यामध्ये उत्तम कामगिरी करत सर्वांना उत्कृष्ट बक्षीस मिळाली. त्यामध्ये बेस्ट कोरिओग्राफर म्हणून नितीन मोरे यांनी नंबर पटकावला. सदर कार्यक्रम प्रवीण इंगळे यांनी आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनील चव्हाण, नीरज गायकवाड, आश्रू कांबळे, वैभव इंगळे, श्रावण राजे, आकाश पवार यांच्या प्रयत्नाने संपन्न झाला.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button