फलटण – लोणार लांबपल्याची नवीन बसफेरी झाली सुरु
MH 28 News Live, लोणार : जागतिक किर्तीच्या ‘ अ ‘ दर्जा प्राप्त पर्यटन स्थळ लोणारसाठी सातारा विभागाची तसेच फलटण आगाराची, फलटण – लोणार ही नवीन बसफेरी दि. २ मे पासून सुरू झाली आहे.
प्रवासी, पर्यटक, व्यापारी, विद्यार्थी, भक्तगण, यांच्या सेवेसाठी सुरु करण्यात आली असून सदर फेरी फलटण येथून सकाळी ०८.३० वाजता निघेल. बारामती, कर्जत, भिगवण, राशीन, जामखेड, पाटोदा, बीड, गेवराई, अंबड, जालना, नाव्हा, सिंदखेड राजा, किनगांव राजा, दुसरबिड, बिबी व सुलतानपूर मार्गे लोणार येथे रात्री ०८.३० वाजता मुक्कामी पोहचेल. लोणार येथून सदर फेरी सकाळी ०६.१५ वाजता निघून ती फलटण येथे सायंकाळी ०५.०० वाजता पोहचते. प्रवाशांच्या सेवेसाठी सदर फेरी सुरु केल्याबद्दल सुहास जाधव, महाव्यवस्थापक (वाहतुक) रा. प. मुंबई, अजित गायकवाड, उपमहाव्यवस्थापक, नियंत्रण समिती क्र.०१, सागर पळसुले, विभाग नियंत्रक सातारा, ज्योती गायकवाड, विभागीय वाहतुक अधिकारी, सातारा, फलटण आगाराचे आगार व्यवस्थापक वाडेकर यांचे प्रवाशांच्या वतीने प्रवाशी सेवा संघटना, लोणार यांनी आभार व्यक्त केले. सदर फेरीचा लाभ घेवून फेरीच्या उत्पन्नात वाढ करून सदर फेरी कायम स्वरुपी सुरु ठेवण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन प्रवासी सेवा संघटनेचे शेख उस्मान शेख दाऊद भागवत खरात यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button