अज्ञात वाहनाच्या धडकेत इसम जागीच ठार… जळगाव जामोद तालुक्यातील दुर्घटना. वाळू तस्करी करणार्या वाहनाने बळी घेतल्याची आहे चर्चा
MH 28 News Live, जळगांव जामोद : शेतातील फळबागेला पहाटे पाणी देण्याकरिता पायी जात असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत 45 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यू. झाल्याची घटना दि. 14 मे रोजी सकाळी सहा वाजेदरम्यान उघडकीस आली.
सदर मृत पावलेल्या व्यक्तीचे नाव पद्माकर मधुकर गावंडे ( 45 ) रा. सातळी, ता. जळगाव जामोद. सदर मयत त्यांचे लहान भाऊ रामराव मधुकर गावंडे यांच्या मालकीच्या शेतामध्ये लिंबू पेरू फळबाग लावलेली असल्यामुळे त्या फळबागेला पहाटे पाच वाजेदरम्यान पाणी देण्यासाठी टाकळी ते माऊली जाणाऱ्या शेतातील कच्च्या रस्त्याने जात येत असत. मृतक पद्माकर गावंडे हे दिनांक 14 मे रोजी असेच पहाटे उठून फळबागेला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांना पहाटेच अज्ञात वाहनाने धडक देऊन वाहन घेऊन अज्ञात आरोपी फरार झाला. सदर घटनेची माहिती सकाळी सहा वाजेच्या सुमारास गावातील गजानन पारस्कर व महेश पारस्कर भागवत पारस्कर यांनी घरी असलेल्या विठ्ठल ज्ञानदेव मालठाणे यांना झोपेतून उठवून सांगितले की तुमचे मेहुणे तुकाराम पारस्कर यांच्या शेताजवळ जखमी होऊन पडलेले आहेत. हे ऐकताच विठ्ठल मालठाणे हे काही लोकांसोबत घटनास्थळावर पोहोचले असता त्यांना त्यांचे मेहुणे गंभीर जखमी अवस्थेत दिसले असता त्यांच्या डोक्यास काना चेहऱ्यास मोठ्या जखमा झालेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्यांना उडविले असून त्याबद्दल त्यांनी सदर घटना मृतकाचे भाऊ सुधाकर गावंडे यांना अपघाताची माहिती दिली तसेच टाकळी पारस्कर येथील पोलीस पाटील मारुती चांभारे यांनी या अपघाताची माहिती जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली असता जळगाव जामोद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला सदर घटनेची फिर्याद मृतकाचे मेव्हणे विठ्ठल मालठाणे यांनी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला दिली. पंचनामा झाल्यानंतर मृतकाला बोलेरो पिकप या वाहनाने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले असून सदर मृतकाचे शवविच्छेदन करून त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात त्यांच्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आली आहेत.
सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रात्री – बेरात्री वाळू तस्कर मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी करण्याकरिता आपली वाहने सुसाट चालवत असतात त्यांच्या या निष्काळजीपणामुळे एका निरपराध माणसाचा जीव गेला हे खूप दुःखदायक घटना असून महसूल प्रशासन कुंभकर्णी झोप येत आहे की काय याबाबत नागरिक बोलत असून या मृत्यूस महसूल प्रशासन जबाबदार आहे असे नागरिक बोलत आहेत. मृतक पद्माकर गावंडे वय 45 यांना अज्ञात वाहनाच्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवून यांचा जीव घेतला असून या मृत्यूप्रकरणी पोलीस प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button