♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे राज्य सरकार करणार कमी

MH 28 News Live : शालेय शिक्षण विभागाने नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जूनपासून सुरू होणार्‍या नव्या शैक्षणिक वर्षात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना जाडजूड दफ्तर आणावे लागणार नाही. केवळ एका पुस्तकावर पहिल्या तिमाहीचे शिक्षण दिले जाईल.

भाजपा-शिवसेना सरकारच्या काळात दप्तराचे ओझे कमी करण्याचा प्रयत्न झाला होता. पण या प्रयत्नांमुळे केवळ दप्तरातील पाण्याची बाटली तेवढी कमी झाली होती. आता दप्‍तराचा भार हलका करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी पहिली ते चौथी च्या विद्यार्थ्यांना पहिल्या तिमाहीसाठी केवळ एक पुस्तक देण्याचा निर्णय घेतला आहे. या पुस्तकामध्ये सर्व विषयांचा पहिल्या तीन महिन्याचा अभ्यासक्रम असेल. विद्यार्थ्यांना दररोज वर्षभराच्या अभ्यासाची सर्वच पुस्तके शाळेत घेऊन येण्याची गरज पडणार नाही. वर्षातील चार शैक्षणिक सत्रांसाठी केवळ चार पुस्तके असतील, असे प्रा. गायकवाड म्हणाल्या.

शैक्षणिक वर्ष 2022-23पासून इयत्ता 1 ली ते दुसरी वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ‘मल्टी लँग्वेजेस इंटिग्रेटेड बुक’ असतील. या वर्षात यश मिळाल्यानंतर त्यापुढील वर्षापासून 3 री आणि 4 थी च्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारचा अभ्यासक्रम लागू होईल.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129