तो लाचखोर आरएफओ अखेर झाला निलंबित
MH 28 News Live, जळगाव जामोद : लाकूड व्यापाऱ्याचा पकडलेला वाहन सोडविण्यासाठी 19 हजाराची लाच घेणारा जळगाव जामोद येथील आरएफओ बी. डी. कटारिया याला अखेर वनविभागाच्या सेवेतून शासनाने निलंबित केले आहे.
बुलडाणा एसीबीच्या पथकाने 13 मे च्या सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास त्यांच्या कार्यालयातच लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली होती. जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी कटारियाची रवानगी न्यायालयीन कोठडीत बुलडाणा तुरुंगात करण्यात आली होती. याप्रकरणी अमरावती सीसीएफ जी.के. अनारसे यांनी 19 मेला एका आदेशान्वये लाचखोर आरएफओ कटारिया यांना निलंबित केले असून जळगाव जामोद आरएफओ पदाचा अतिरिक्त पदभार खामगावचे आरएफओ किशोर पडोळ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button