
पावसाच्या पाण्यापासून वाचण्याच्या धडपडीत वीज पडून 3 गाईचा लोणार तालुक्यात दुर्दैवी मृत्यू
MH 28 News Live : लोणार तालुक्यातील तांबोळा येथे 19 मे रोजी संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास अचानक वादळी वारा व विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडत असताना अचानक विज पडून 3 गायी जागीच ठार झाल्या. यामध्ये अशोक रामदास राठोड यांची एक गाय व मधुकर रामदास राठोड यांच्या दोन गाईचा मृत्यू झाला असून दोन्ही शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
सदर गाई शेतात चरत असताना अचानक वातावरणात बदल होत सोसाट्याचा वाऱ्यासोबत मेघगर्जनेसह पाऊस पडायला सुरुवात झाली. पावसाच्या पाण्यापासून वाचण्यासाठी या तिने गाईंनी शेतातील एका चिंचेच्या झाडाचा आसरा घेतला व तिथेच घात झाला. चिंचेच्या झाडाजवळ अचानक वीज कोसळली व तिन्ही गाई वीज कोसळून जागीच गतप्राण झाल्या. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यावर नुकसान ओढावले या घटनेचीमाहिती तहसीलदार सैपन नदाफ यांना मिळताच त्यांनी तात्काळ महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले. यावेळी सविस्तर पंचनामा करण्यासाठी तलाठी नितेश राणे, कोतवाल राम डोईफोडे यांनी महसूली पंचनामा केला. गाईच्या शवविच्छेदनासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रवी मुसळे, पशु सहाय्यक डॉ. मंगेश पवार, डॉ
अमोल राठोड यांनी मोलाची मदत केली. यावेळी तांबोळा बीटचे पोहे काँ गजानन सानप, पो काँ विशाल धोंडगे हे उपस्थित होते.