
पेठ ते शेलसुर रस्त्याचे काम तात्काळ सुरु करा; मनसेचे सा.बांधकाम विभाग यांना निवेदन
MH 28 News Live, चिखली : मौजे पेठे पासुन सुरू झालेल्या पेठ – बुलडाणा रस्त्याची अवस्था आज रोजी अत्यंत दैनिय झालेली असून पेठ ते शेलसुर पर्यंतच्या रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून परिसरातील नागरिकांना रस्त्यावरून वाहन चालवणे देखिल कठीण होत असून धोक्याचे होत आहे. त्यामुळे मनसेचे चिखली तालुका सचिव प्रवीण देशमुख यांनी दि. 20 मे 2022 रोजी उपकार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना निवेदन दिले.
आगामी तोंडावर आलेला असून एखादा अनुचित प्रकार घडू नये अगोदर रस्त्याचे तात्काळ काम सुरू करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली त्याच रस्त्यावरून उतरादा आंधई, शेलोडी, धोत्रा भनगोजी, शेलसुर मार्गे बुलढाणा यांसारख्या अनेक गावांमध्ये जाण्यासाठी हाच एकमेव व मुख्य रस्ता असून गावातील शाळकरी मुलांना चिखली शहरात येण्या जाण्या करिता परिसरातील श्रमिक कास्तकार बंधूंना आपल्या शेतातील मालाची ने-आण करण्याकरिता याच मुख्य रस्त्याचा वापर करावा लागतो मात्र गत काही वर्षांपासून रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट व दैनंदिन झालेली आहे तरी या रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी मनसे च्या वतीने करण्यात आली त्यावेळी मनसे तालुका सचिव प्रवीण देशमुख, उप तालुकाध्यक्ष संदीप नरवाडे यांसह संजय दळवी, सुनील ठेंग, ज्ञानेश्वर हाडे, समाधान म्हस्के,संदिप म्हस्के ,विशाल कापसे ,विवेक पवळ ,राहुल पोफळे ,दिपक जाधव ,नागेश इंगळे, निखिल काळे दिपक भुतेकर उपस्थीत होते.