♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सेनादलात जाण्यासाठी इच्छुक आहात का ? NDA ची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे

MH 28 News Live : देशातील तरुण – तरुणींना लष्करात जाण्याची संधी मिळणार आहे. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) या तिन्ही दलांच्या अधिकार्यांसाठी दर्जेदार प्रशिक्षण देणारऱ्या संस्थेची प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने एनडीए प्रवेश प्रक्रियेअंतर्गत घेण्यात येणा-या लेखी परीक्षेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. इच्छुक उमेदवारांना 7 जून पर्यंत अर्ज भरता येणार आहेत. Application process for “NDA” admission started; Apply from this website

या पदांसाठी भरती

ही प्रवेश प्रक्रिया एनडीएच्या 150 वी आणि नेव्हल अँकॅडमीच्या 112 व्या तुकडीसाठी असून यामध्ये एकूण 400 जागा राखीव आहेत. या 400 पैकी 370 जागा एनडीएसाठी असून, 19 जागा मुलींसाठी राखीव ठेवल्या आहेत, तर नेव्हल अँकॅडमीसाठी 30 जागा असून, ही प्रवेश प्रक्रिया केवळ मुलांसाठी आहे.

एनडीएमध्ये 3 वर्षांचे प्रशिक्षण

बारावी उत्तीर्ण झालेल्या व बारावीत असलेल्या मुला-मुलींना या प्रवेश प्रक्रियेत सहभाग घेता येणार आहे. यासाठी वयोमर्यादा देखील ठेवली आहे. एनडीएची प्रवेश परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार असून, लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या मुलाखती द्याव्या लागणार. त्यानंतर वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पार पडेल. या प्रक्रियेपासून निवडण्यात आलेल्या उमेदवारांना एनडीएमध्ये तीन वर्षांचे प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण जुलै 2023 पासून सुरू होईल.

एनडीए प्रवेश प्रक्रियेशी निगडित माहिती व अर्ज भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी upsconline.nic.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरावा.

Application process for “NDA” admission started; Apply from this website

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129