♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मुख्याधिकारी मोकळ यांनी केले देऊळगाव राजा शहर झालं इतिहासात प्रथमच रहिवासी अतिक्रमण धारकावर न. प. ची बेधडक कार्यवाही

MH 28 News Live, देऊळगाव राजा : दि. 24 मे रोजी सकाळ पासूनच देऊळगाव राजा शहरातील वॉर्ड नंबर 2 मधील समता नगर जवळ वसलेल्या अतिक्रमित झोपरपट्टीत अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू झाली. विशेष म्हणजे याद्वारे शहराच्या इतिहासात प्रथमच रहिवासी अतिक्रमण उठवण्यात आले.

या भागातील कच्ची घरे, पत्र्याची घरे तर काही पक्के वीटा मातीचे बांधकाम असलेल्या घरे पडण्याची मोहीम सुरू झाली.
या अतिक्रमण केलेल्या जागेची जमीन ही कोष्टी साळी समाजाच्या समशानभूमीसाठी शासनाने बऱ्याच वर्षापूर्वी दिलेली होती. त्या जागेत त्यांच्या पूर्वजाच्या काही समाध्या आहेत. परंतु अलीकडे त्या जागेवर त्यांच्या समाजाचे अंतविधी होत नसल्याने व ती जागा रिक्त खाली असल्यामुळे गोर गरीब, मजूर लोकांना राहण्यासाठी तेथे अतिक्रमण करून घरे बांधली. त्यांना रहवाशी म्हणून नगरपालिकेने टॅक्स पावती देऊन नळ पाणी सुविधा, वीज सुविधा उपलब्ध करून सुद्धा दिल्या,
परन्तु मागील दोन वर्षापासून कोष्टी समाजाच्या लोकांनी त्यांच्या हक्काच्या समशान भूमी जागेची मागणी करत नगर पालिका प्रशाषणाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे जवळपास 6 महिन्यासापुन त्या जागेवरील रहात असलेल्या लोकांना नगरपालिका यांनी हक्क नोंद रद्द करण्याच्या नोटिसा दिल्या तसेच जागा खाली करण्याच्या सुद्धा रीतसर नोटीस बजावल्या परन्तु तेथील लोकांनी जागेचा ताबा न सोडल्याने अखेर आज रोजी त्यांच्या रहात असलेल्या घरावर बुलटोजर चालुउन घरे पाडण्यात आली, आता पर्यन्त देऊळगाव राजा शहरातील रहवाशी घरे पाडण्याची पहिलीच घटना आहे.

अतिक्रमण फक्त गरिबांचे काढणार की श्रीमंतांचे सुदधा अश्या प्रकारची कुजबुज शहरात अनेक लोकांमध्ये होतांना दिसली. यावर नगरपालिकेचे मुख्यअधिकारी मोकळ यांनी ठाम भूमिका घेत देऊळगाव राजा शहरात अडथळा निर्माण करणारे बस स्टॉप चौक परिसरातील तसेच चिखली रोड व जाफराबाद रोड लगतची सर्व अतिक्रमणे काढण्यात येत आहेत व जी बाकी आहेत ती सुध्दा पाडण्यात काढण्यात येईल अशी ठाम भूमिका घेतली.

अतिक्रमण काढण्यात आल्याने गुदमरलेले देऊलगावराजा शहर मोकळा स्वास घेईल याकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. बातमी लिही पर्यन्त अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरूच होती. या मोहिमेत नगरपालिकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी मोकळ सकाळ पासून स्वतः हजर होते. त्याच बरोबर नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्युत पुरवठा जागोजागी चालू बंद करून मदत करणारे महावितरणाचे लाईनमन कर्मचारी व त्याचबरोबर सुरक्षा म्हणून पोलीस अधिकारी सातव, तहसील कार्यालयाचे कर्मचारी व इतरही पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129