
भाजपा भटक्या विमुक्त आघाडी तर्फे आ श्वेताताई महाले यांची घेतली भेट
MH 28 News Live, चिखली : भाजपा भटक्या विमुक्त आघाडी दौऱ्यानिमित्य चिखली येथे आघाडीच्या पदाधिकार्यांनी आ. श्वेताताई महाले यांची त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी अनेक विषयांवर चर्चा झाली.
अजूनही समाजाच्या मुख्य प्रवाहात नसलेला भटका समाज यांच्या विविध समस्या संदभार्त व भटक्या विमुक्त महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्याच्या समस्या सोडवण्यासाठी आ. श्वेताताई महाले यांना भाजप भटक्या विमुक्त महिला आघाडी प्रदेशध्याक्ष डॉ उज्वलाताई हाके यांच्या नेतृत्वाखाली चर्चा करण्यात आली. या प्रसंगी रश्मी जाधव (विदर्भ अध्यक्ष भ.वि.आ), डॉ जयश्री गुट्टे (पश्चिम विदर्भ अध्यक्ष), डॉ. पंकज भिवटे (विदर्भ अध्यक्ष भाजप वैद्यकीय आघाडी डेंटलविंग), नगरसेविका प्राजक्ता माहितकार, डॉ. ऋतुराज सागळे, (जिल्हाध्यक्ष भाजप वैद्यकीय आघाडी डेंटलविंग ) व अन्य पदाधिकारी हे प्रामुख्याने उपस्थित होते. आ श्वेताताई महाले यांनी भटक्या विमुक्त समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी सदैव तत्पर राहू असे आश्वासन यावेळी दिले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button