
समर्थ भारत केंद्रातर्फे स्वातंत्र्यवीरांना जयंतीनिमित्त अभिवादन
MH 28 News Live, चिखली : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी क्रांतिकारक, थोर समाजसुधारक, राजकीय हिंदूत्वाचे प्रणेते, चतुरस्त्र साहित्यिक, निस्सीम विज्ञानवादी, तर्कनिष्ठ बुध्दीवादी, ओजस्वी वक्ते आणि बहुआयामी व्यक्तीमत्वाचे धनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना १३९ व्या जयंती निमित्त समर्थ भारत केंद्रातर्फे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन दि. २८ मे रोजी करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक अरविंदराव असोलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमास ज्येष्ठ नेते रामदासभाऊ देव्हडे आणि महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे अध्यक्ष रमेशराव सराफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समर्थ भारत केंद्राचे प्रवर्तक रेणुकादास मुळे यांनी केले. सामाजिक कार्यकर्ते सुनील वायाळ, अमोल उरसाल, नगरसेवक गोविंद देव्हडे, भाजपा शहराध्यक्ष पंडितराव देशमुख, पत्रकार सुधीर लंके, पवन लढ्ढा, कवी सत्य कुटे, चिखली अर्बन बँकेच्या संचालिका सुनीता भालेराव, सहकार भारतीचे सुदर्शन भालेराव, विजय जोशी, रमेश सोनवाल आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. स्वप्नील मापारी यांनी आभार मानले. सामुहिक राष्ट्रगीत गायनाने या कार्यक्रमाचा समारोप झाला.



