दूर्लक्षीत वास्तव… वाळू वाहून नेणारे ट्रक बनताहेत अपघाताला कारण. चिखलीकर झाले भयग्रस्त. महसूल विभाग दखल घेईल काय ?
MH 28 News Live, सत्य कुटे, चिखली : महसूल विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रेती घाटांचा लिलाव आणि विक्री, वाहतुक या सर्व बाबींचा विचार करता बुलडाणा जिल्ह्यातील चिखली शहर हे गत काही वर्षांपासून वाळू माफियांचे माहेर घर बनले आहे. अवैध रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसुल विभागामार्फत कारवाई करण्याच्या किरकोळ घटना मागील काही वर्षांत घडवुन आणल्याचेही प्रकार जनमानसासमोर असतांना काल परवा भरधाव टिप्परमुळे शहरातील मुख्य रस्त्यावर झालेला भीषण अपघात आणि तरीही अजुनही शहरातुन टिप्परची वाहतुक सुरुच आहे. याकडे महसुल विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
संभाजी नगर परिसरात ज्या मार्गावर लहान मुलांची शाळा व अनेक लहान मोठे खाजगी शिकवणी वर्ग आहेत अशा नागसेन बुध्द विहाराच्या पश्चिमेकडील रस्त्यावरुन या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परची ये जा सुरु असते, विशेष म्हणजे या रस्त्यावर एकही गती रोधक नाही. शहरातून धावणाऱ्या शिगोशीग टिप्परमधुन हवेमुळे वाळूचे बारीक कण उडुन पादचान्यांसह छोट्या मोठ्या वाहन धारकांच्या डोळ्यात गेल्याने किरकोळ अपघातही घडत आहेत हेही महत्वाचे.
वाळूच्या वाहतुकीतुन होते लाखो रुपयांची उलाढाल
तुर्तास सर्वत्र पाणि टंचाईचे सावट असुन बहुतेक बांधकामेही थांबली असल्याचे चित्र असुन पावसाळ्यात बांधकाम करण्याच्या हेतुने तसेच पावसाळ्यात रेती चढ्या भावाने विकता यावी या साठी वाळू माफियांच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात रेती साठवणुक करण्यात येत आहे. या अवैध वाळू साठवणुकीसाठी टिप्परच्या माध्यमातुन खडकपूर्णा नदी पात्रांवरील विविध वाळू घाटांवरुन नियम बाह्य वाळू उपसा करीत मोठ्या प्रमाणात वाळू व्यवसाय माफियांच्या माध्यमातुन केला जात आहे. महसूल विभागासह जिल्हा प्रशासनाचे याकडे लक्ष आहे की… तेरे खत मे मेरा सलाम या सारखी परिस्थिती असल्याचे जनमाणसांत बोलले जात आहे. या लाखो रुपायाच्या अवैध वाळू वाहतुकीसोबतच शहरातून होणारी वाळू वाहतुक लवकरात लवकर भांबवून सर्वसामान्य नागरीकांना दैनंदिन सुखावह जीवन द्यावे अशी मागणी चिखलीकर करत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button