
देऊळगाव माळी येथे पार पडला खरीप पूर्व नियोजन व शेतकरी मेळावा
MH 28 News Live, मेहकर : तालुक्यातील देऊळगाव माळी येथे श्री पांडुरंग संस्थान मंगल कार्यालयात खरीप पूर्व नियोजन व शेतकरी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्या, पीकबदल, खत व्यवस्थापन, अंतर मशागत, पिकावरील फवारणी, इत्यादी विषयावर कृषिरत्न डॉक्टर दिलीप उदासी यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
विठू माऊली कृषी सेवा केंद्र आयोजित शेतकरी मेळाव्यास परिसरातील बहुसंख्य शेतकरी, तथा पत्रकार बांधव, व मान्यवर मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश मगर यांनी केले.