♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

124 गावात पाणी टंचाईचे निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने केला हा उपाय

MH 28 News Live, बुलडाणा : पाणीटंचाई निवारणार्थ सिं.राजा तालुक्यातील 30, चिखली तालुक्यातील 9, बुलडाणामधील 27, दे.राजा मधील 15, मेहकर तालुक्यातील 26, लोणारमधील 5, मोताळा तालुक्यातील 3, मलकापूरमधील 1 व खामगांव तालुक्यातील 8 गावासाठी 151 विंधन विहीरी मंजूर करण्यात आल्या आहेत. अशाप्रकारे एकूण 124 गावांमध्ये पाणी पुरवठ्यासाठी उपाय योजना करण्यात आल्या आहेत. विंधन विहीरी घेण्यात आलेल्या गावांमध्ये ही कामे सुरू करण्यापूर्वी व काम पूर्ण झाल्यानंतर कामाचा पंचनामा कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यांनी करावयाचा आहे.

विंधन विहीरी सिंदखेड राजा तालुक्यातील आडगांव राजा, केशवशिवणी, किनगांव राजा, कुंबेफळ, मलकापूर पांग्रा, मोहाडी, साखरखेर्डा, शेंदुर्जन, देऊळगांव कोळ, दुसरबीड, हिवरखेड, खामगांव, पिंपळगाव लेंडी, नशिराबाद, लिंगा, सवडद, खैरखेड, सोयंदेव, चांगेफळ, चिंचोली, देवखेड, वाघाळा, हिवरा गडलिंग, जऊळका, कोनाटी, महारखेड, पिंपरखेड, रताळी, शिवणी टाका, वरूडी, चिखली तालुक्यातील पांढरदेव, धोत्रा भनगोजी, उत्रादा, शेलोडी, सावरगांव डुकरे, आंधई, अमडापूर, गोद्री, भालगांव, खामगांव तालुक्यातील खामगांव ग्रामीण, लाखनवाडा खु, बोथाकाजी, आडगांव, बोरी, गेरु माटरगांव, कारेगांव, आवार, मलकापूर तालुक्यातील वडोदा, मोताळा तालुक्यातील आडविहीर, बोराखेडी, तरोडा, लोणार तालुक्यातील जांभूळ, राजणसी, नांद्रा, गोत्रा, वेणी, दे. राजा तालुक्यातील दे. मही, गिरोली, भिवगांव बु, जुमडा, पिंपळगांव बु, गिरोली खु, कुंभारी, धोत्रा नंदई, पिंपळगांव चिलमखा, किन्ही पवार, वानेगांव, आळंद, वाकी बु, सावंगी टेकाडे, वाकी खु, मेहकर तालुक्यातील डोणगांव, लोणी काळे, पांगरखेड, शहापूर, विश्वी, रत्नापूर, मांडव, वरवंड, आंध्रुड, बरटाळा, उसरण, चिंचोली बोरे, पाथर्डी, उमरा देशमुख, पेनटाकळी, विठ्ठलवाडी, नागापूर, शेलगांव देशमुख, लोणी गवळी, भोसा, दे. साकर्षा, दादुल गव्हाण, वर्दडी वैराळ, पिंपळगांव उंडा, भिवापूर, गोहेगांव, बुलडाणा तालुक्यातील म्हसला खु, बिरशिंगपूर, भडगांव, धाड, पिं. सराई, रूईखेड मायंबा, साखळी खु, भादोला, पाडळी, मासरूळ, सुंदरखेड, अफजलपूर वाडी, दत्तपूर, कोलवड, येळगांव, माळविहीर, देऊळघाट, पळसखेड नागो, ईरला, कुलमखेड, कुंबेफळ, रायपूर, साखळी बु, मोंढाळा, सातगांव म्ह, सागवन व बोरखेड या गावांसाठी विंधन विहीर मंजूर करण्यात आली आहे. यामुळे या गावांमधील पाणीटंचाई सुसह्य होण्यास निश्चितच मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129