मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करावा
MH 28 News Live, बुलडाणा : सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षेचे आरक्षीत जागेवर प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र ससादर करणे अनिवार्य आहे. जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी नियमानुसार समितीकडे अर्ज केल्यानंतर साधारणत: 3 महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्राबाबत समिती निर्णय घेते. तरी ज्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी अद्याप जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी अर्ज सादर केलेला नाही. त्यांनी ज्या जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केलेला आहे, त्याच जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी त्वरित अर्ज सादर करावा.
जात वैधता प्रमाणपत्रा अभावी मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळणेपासून वंचित राहू नये व समितीस पुरेसा वेळ मिळावा यासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करावा, असे आवाहन संशोधन अधिकारी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मनोज मेरत यांनी केले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button