
अधिकृत घोषणा होईपर्यंत समृद्धी महामार्गाचा प्रवासासाठी उपयोग करू नये. राज्य रस्ते विकास महामंडळाचे आवाहन
MH 28 News Live, बुलडाणा : जिल्ह्यातील समृद्धी महामार्गाचे बहुतांशी काम पुर्ण झालेले आहे. त्यामुळे या महामार्गावरून अनधिकृत व विनापरवानगी वाहतूक, वर्दळ सुरू आहे. अद्याप महामार्गावरून अधिकृतपणे वाहतूकीस परवानगी देण्यात आलेली नाही. वाहतूक सुरक्षिततेची काही कामे करणे प्रगतीत आहे. अनधिकृत वाहतूकीमुळे काही ठिकाणी अपघात होऊन जिवीत हानी देखील झालेली आहे. सर्व जनतेस व वाहनधारकांनी या महामार्गावर वाहतूक सुरू करण्याची अधिकृत घोषणा होईपर्यंत समृद्धी महामार्गाचा प्रवासासाठी उपयोग करू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता बी. पी. साळुंके यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.



