
विक्रेते, कंपन्या आणि प्रशासनाने समन्वय साधून खतांचा पुरवठा सुरळीत करावा – आ. श्वेताताई महाले
MH 28 News Live, चिखली : नेहमी प्रमाणेच यावर्षी सुद्धा पेरणी पूर्वीच खतांची टंचाई निर्माण झालेली आहे. प्रशासनाकडून खतांची टंचाई नाही असे सांगितल्या जाते मात्र प्रत्यक्षात बाजारात खते मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. काही खत उत्पादक कंपन्यांनी ब्रँडेड खता सोबत इतर खते लिकींग करुन शेतकऱ्यांची लूट करीत आहे. शेतकऱ्यांच्या या होणाऱ्या लुटिवर प्रशासनाचे डोळेझाक करीत आहे . खते उत्पादक कंपण्या विक्रेत्यांवर दबाव टाकून लिंकिंग खते विकण्यास भाग पाडत आहे . प्रशासन कंपन्यांवर काहीही कारवाई न करता विक्रेत्यांवर कारवाई करत आहे. त्यामुळे विक्रेते भिक नको पण कुत्रा आवर असे म्हणून बचावात्मक पवित्रा घेत आहे त्यामुळे मात्र यात शेतकरी भरडल्या जात असल्याने विक्रेते ,कंपन्या आणि प्रशासन यांनी समन्वय साधून खतांचा पुरवठा सुरळीत करण्याचे आवाहन आ. श्वेताताई महाले पाटील यांनी खते विक्रेते आणि कृषी विभाग यांच्या घेतलेल्या संयुक्त बैठकीला संबोधन करताना केलें.
दि १५ जून रोजी चिखली पंचायत समितीच्या सभागृहात आ. श्वेताताई महाले यांनी शेतकऱ्यांना मुबलक खते व बियाणे मिळावे यासाठी खते विक्रेते आणि कृषि विभाग यांची संयुक्तपणे बैठक घेतली. खते टंचाई बाबत खते विक्रेते आणि कृषी विभाग यांच्या सांगण्यात विसंगती निर्माण होत आहे. दोघेही आपापली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याने खते उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधीसोबत बैठक आयोजित करण्याची मागणी आ. श्वेताताई महाले पाटील यांनी यावेळी केली.
आ. महाले यांनी DAP खते बैठकीतच रिलीज करावयास लावली
कृषी विभागाने DAP खते भविष्यात टंचाई निर्माण होऊ नये याकरिता रिझर्व ठेवली होती . यामुळें शेतकऱ्यांना खते असुन ही खते मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. असे अनेक शेतकरी आ. श्वेताताई महाले यांनी आयोजित केलल्या बैठकीत येवून त्यांनी त्यांची कैफियत आ श्वेताताई महाले याना सांगितली. त्यावर आ सौ श्वेता ताई महाले यांनी जिल्हा कृषी अधीक्षक नाईक यांना याबाबत जाब विचारला असता DAP खते रिझर्व असल्याचे त्यांनी सांगीतले त्यावर तातडीने खते रिलीज करण्याच्या सूचना आमदार महोदय यांनी दिल्याने बैठक सुरू असतानाच खते रिलीज करण्याचे आदेश काढल्याने DAP खतांची विक्री सुरू झाली आहे.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी संतोष डाबरे , तहसीलदार डॉ अजितकुमार येलें, गटविकास अधिकारी सुमित जाधव , कृषी अधिकारी संदिप सोनुने , भाजपा तालुका अध्यक्ष ॲड सुनील देशमुख, यांची प्रमुख उपस्थिती होती. तर चीखली शहरातील सर्व खत विक्रेते उपस्थीत होते.