
राहुल गांधींच्या ईडी चौकशी विरोधात डोणगाव येथे युवक काँग्रेसची मशाल रैली
MH 28 News Live, डोणगाव : काँग्रेस नेत्यांच्या विरुद्ध आकसपूर्ण बुद्धीने ईडी ची कारवाई करण्याच्या केंद्रातील भाजपा सरकारच्या निषेधार्थ सुरू असलेल्या तीव्र आंदोलनाचे लोण आता बुलडाणा जिल्ह्यातही पसरले असून आज डोणगाव येथील आरेगाव चौकात युवक काँग्रेस च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी करण्यात आलेल्या गगन भेदी घोषणेने आरेगाव चौकच नव्हे तर अर्धेअधिक शहर दणाणले.
युवक काँग्रेसचे बुलडाणा जिल्हा महासचिव ज़ैनुल आबेद्दीन शेख यांच्या नेतृत्वाखाली 17 जूनला संध्याकाळी 7 वाजता चाललेल्या आंदोलना मध्ये काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले. गगनभेदी घोषणानी परिसर दणाणला. या आंदोलनात बुलडाणा जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव ज़ैनुल आबेद्दीन शेख,किसान कॉग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक टाले,युवक कॉग्रेसचे अब्दुल वसीम अब्दुल वहाब, रवी काळे, आवेज खान अखतर खान, इसराईल खान, मोहम्मद आवेज, सैय्यद शाहरुख, मजहरोद्दीन सद्दाम शेख, शेख नुर शेख रफीक, असलम खान, शेख तनवीर, जावेद शेख असलम कुरैशी आदी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.