♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

सर्पमित्रांसारखे आता तयार होणार ‘ मधमाशीमित्र ‘, कोल्हापूर जिल्ह्यात पहिला प्रयोग

MH 28 News Live : सर्पमित्र’च्या धर्तीवर आता ‘मधमाशीमित्र’ तयार केेले जाणार आहेत. राज्यातील हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे. याकरिता पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 25 जणांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.

नागरी वस्तीत मधमाश्यांच्या पोळ्यांची संख्या मोठी आहे. अनेकदा मधमाश्यांची ही भली मोठी पोळी पाहून अनेकदा धडकी भरत असते. मोठ्या इमारती, झाडांना लटकलेली ही पोळी अनेकवेळा विविध कामांत अडथळाही ठरत असतात. या पोळ्यांना धक्‍का लागला आणि मधमाश्या पोळ्यांतून बाहेर पडल्या, तर अधिक धोकादायक ठरू शकतात. मधमाश्यांच्या चाव्याने गंभीर जखमी होण्याचेही प्रकार घडत असतात. मधमाश्यांच्या चाव्याने मृत्यू झाल्याच्याही घटना घडतात.

मधमाश्यांची पोळी दिसली की, सहसा जाळून काढली जातात. यामुळे मधमाश्यांच्या मृत्यूचा धोका अधिक असतो. तसेच पोळी जाळल्याने शुद्ध मधही वाया जातो. या सर्व पार्श्‍वभूमीवर मधमाश्यांची पोळी सुरक्षितपणे काढली जावीत, याकरिता मधमाशीमित्र ही संकल्पना राबवण्याचा जिल्हा प्रशासनाचा विचार आहे. पहिल्या टप्प्यात 25 जणांना याबाबतचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाणार आहे. या संकल्पनेमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी होईल. आग्या माशी वाचवता येईल. याबरोबरच संबंधित तरुणांना रोजगारही उपलब्ध होईल, असे महात्मा गांधी नॅशनल फेलो संदेश जोशी यांनी सांगितले.

मधमाशीमित्रांसाठी हेल्पलाईनही सुरू केली जाणार आहे. त्याद्वारे नागरिकांना मधमाशीमित्रांशी संपर्क साधता येईल. या मधमाशीमित्रांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढवली जाणार आहे. या मधमाशीमित्रांना जिल्हा प्रशासनाकडून प्रमाणपत्र देण्यात येईल.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129