पोलीस पाटलाचा घरात जळून दुर्दैवी मृत्यू. लोणार तालुक्यातील कुंडलस येथील दुर्दैवी घटना
MH 28 News Live, लोणार : तालुक्यातील लोणार शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मौजे कुंडलस येथील माजी पोलीस पाटील एकनाथ शंकर काकडे वय ६२ यांचा दिनांक ५ जुलै २०२२ रोजी मध्यरात्री एक ते दोन वाजे दरम्यान घराला लागलेल्या आगीत जुने माळवद जळून अंगावर पडून त्या मृतदेहाचा कोळसा होत दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली.
याबाबत सविस्तर असे की कुंडलस येथील माजी पोलीस पाटील एकनाथ काकडे हे आपल्या राहत्या घरी सायंकाळी जेवण झाल्यानंतर झोपी गेले व त्यांचे पत्नी मुले सूना ह्या समोरील घरात झोपले होते अचानक मध्यरात्री घराला अचानक आग लागल्याचे लक्षात आले मात्र जुनी माळवद असल्याकारणाने सदर माळवद अंगावर कोसळल्याने व वरून आगीच्या लाटा सुरू असल्याने त्यातच त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला त्या मृतदेह चा अक्षरशा कोळसा झाला याबाबतची माहिती लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांना मिळतात त्यांनी तात्काळ आपले सहकारी पोहे का रोहिदास जाधव पो का कृष्णा निकम पो का रवींद्र बोरे चालक गजानन ठाकरे यांना घटनास्थळी रवाना केले या आगीची माहिती लोणार नगर परिषदेचे गटनेते भूषण भाऊ मापारी पिंपळनेर कुंडलसचे उपसरपंच गजानन मापारी यांनी घटनेची माहिती मिळताच अग्निशमक घटना स्थळी पाठवले.
मृतदेहाचा पंचनामा जागेवर वैद्यकीय अधिकारी अभय भोसले यांनी केला.
घटनेचा पुढील तपास लोणार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे कॉ. बन्सी पवार व कृष्णा निकम करत आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button