
अमृत जवान सन्मान अभियानाला लोणार तालुक्यातील आजी – माजी सैनिक व कुटुंबातीयांनी सदस्यांनी उपस्थित रहावे – तहसीलदार सैपन नदाफ
MH 28 News Live, लोणार : जिल्हाधिकारी बुलडाणा श्री. एस. राममूर्ती, भा.प्र.से. यांचे संकल्पनेतून अमृत जवान सन्मान अभियान २०२२ लोणार तालुक्यात राबविण्यात येत असून तालुक्यातील सर्व माजी सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंब व कार्यरत सैनिक तसेच सैनिकांच्या विधवा पत्नी यांचे अनेक कामे पाठपुराव्या अभावी तसेच वेळे अभावी प्रलंबित असतात, सैनिकांनी सीमेवर तैनात असल्याने व स्वग्रामापासून दूर असल्याने पाठपुराव्यासअभावी मनुष्यबळ नसल्याने प्रशासनातील कार्यपद्धती पुरेशी माहिती नसल्याने प्रलंबित राहतात.
सैनिकांनी देशासाठी प्राणाची बाजी लावुन नि:स्वार्थपणे देशाची सेवा केली आहे व करत आहेत. त्यांची सेवा व समर्पण विचारात घेता सर्व सैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी व त्यांचा उचित सन्मान करण्यासाठी लोणार तालुक्यातील सर्व महसूल विभाग, भूसंपादन व पुनर्वसन विविध प्रकारचे दाखले रेशनकार्ड पोलीस विभागातील विविध तक्रारी, समस्या, समाजकंटका कडून त्रास होत असल्या बाबत तक्रारी ग्रामविकास विभागाकडील विविध योजनंचा लाभ, ग्रामपंचायत स्तरावरील रहिवास विषयक विविध बाबी, कृषी विभागाकडील विविध योजनांचा लाभ, परिवहन विभागातील परवाने, पाल्यांच्या शिक्षणा समंधी समस्या व इतर अडचणी बाबत दि. १५ जुलै रोजी तहसील कार्यालय लोणार येथील सभागृहात सैनिकी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या करीता गणेश राठोड उपविभागीय अधिकारी मेहकर तथा अध्यक्ष अमृत जवान अभियान तालुकास्तरीय समिती हे संबोधित करणार असून मेळाव्याचे आयोजन अमृत जवान अभियान तालुकास्तरीय समितीचे सचिव तथा लोणारचे तहसीलदार सैपन नदाफ यांनी केले असून मेळाव्यात तालुक्यातील समितीतील सर्व संबंधित सद्स्य उपस्थित राहणार असून लोणार तालुक्यातील सर्व सैनिक परिवारानी लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार नदाफ यांनी केले आहे.



