
राज्यपाल भगतसिंग कोस्यारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्रींचे दर्शन
MH 28 News Live, शेगाव : राज्याचे राज्यपाल महामहीम भगतसिंह कोशियारी तसेच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज ७ जुलै रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींचे दर्शन घेतले.
अकोला येथे आयोजित डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कार्यक्रमानिमित्त राज्यपाल कोशियारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे अकोला येथे आले होते. तेथून श्री संत गजानन महाराजांच्या शेगाव येथील मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची इच्छा झाल्याने राज्यपाल ना. गडकरी अकोला येथून रस्ता मार्गाने शासकीय वाहनाने शेगाव येथे दुपारी चार वाजे दरम्यान श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरात आले. श्रींच्या मंदिर परिसरामध्ये राज्यपाल कोशियारी व गडकरी या मान्यवरांचे श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी स्वागत केले. यावेळी राज्यपाल व केंद्रीय मंत्री यांनी श्रींच्या समाधीचे, राम मंदिराचे व श्रींच्या शयनगृहात जाऊन गादीचे दर्शन घेऊन मंदिर परिसराची पाहणी केली. यावेळी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी मंदिर प्रशासनाच्या उत्कृष्ट स्वच्छता व भक्तांच्या सेवेकरीता करीत असलेल्या कार्याची प्रशंसा करून निळकंठदादा पाटील व इतर विश्वस्तांचे कौतुक केले.
राज्यपाल भगतसिंह कोशियारी आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना श्री संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त निळकंठदादा पाटील यांनी श्रींची मूर्ती भेट देऊन दोघा मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी संस्थानच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध सेवा कार्याबाबत माहिती दिली. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री आ. डॉ. संजय कुटे तसेच विविध खात्याचे अधिकारी, जिल्हाधिकारी, अमरावती विभागाचे महसूल आयुक्त, पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यपालांना शेगाव शहर भाजपाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, माजी नगरसेवक अरुण चांडक यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी यांनी शेगाव शहरात बाबत निवेदन दिले. राज्यपाल भगतसिंग कोशियारी व केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या दौऱ्याला बघता पोलीस प्रशासनाकडून संपूर्ण शेगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. श्रींच्या दर्शनानंतर राज्यपाल व केंद्रीय मंत्री अकोल्याकडे शासकीय वाहनाने रवाना झाले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button