♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

गोडबोले गेटचे दरवाजे एकाचवेळी खुलत असल्याने पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांचे होते नुकसान. यावेळी नूकसान झाल्यास प्रशासनच जबाबदार. शेतक-यांसह स्वाभिमानीचे विनायक सरनाईक यांनी दिला प्रशासनास इशारा

MH 28 News Live, चिखली : येळगाव धरण भरल्यानंतर धरणाच्या सांडव्यात टाकलेले गोडबोले स्वयंचलीत गेट एकाच वेळी पाण्याच्या दबावाने उघडतात त्यामुळे बुलढाणा, चिखली, मेहकर तालुक्यातील नदीकाठी जमिनी असलेल्या शेतकर्याच्या शेतात पुराचे पाणी घुसुन पिकाची नासाडी होत असते. त्यामुळे धरणाखालील पैनगंगा नदिकाठचे शेतकरी यांनी धरणाचे पाणी शेतात घुसणार नाही यासाठी उपाययोजना करण्याची मागणी शेतकर्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी जिल्हाधिकारी, बुलडाणा नगर पालिका मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

मागील वर्षी सततधार व मुसळधार पावसामुळे ऐन सोयाबीन सोंगणीच्या वेळी बुलडाणा येथील येळगाव धरणाचे सांडव्यातील ८० (ऐंशी) स्वयंचलीत गेट पाण्याच्या प्रेशरमूळे एकाचवेळी उघडल्याने पैनगंगा नदिकाठच्या शेतक-यांचे पुराच्या पाण्याने शेतीपीकाचे नूकसान होऊन जमीनी खरडुन गेल्या होत्या. हीच परीस्थीती पैनगंगा नदीकाठच्या शेतक-यांना दरवर्षी उदभवते.मागील वर्षी गेटची दुरुस्ती करण्यात यावी,व शेतीपीकाचे नुकसान होणार नाही.यासाठी उपाययोजना करुण तोडगा काढावा. स्वयंचलीत गेट ऐवजी मानवचलीत गेट बसवण्यात यावेत.अशी मागणी शेतकरी शिष्ठ मंडळासह माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे, रविकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी आणि संबंधीत विभागाकडे केली होती. त्यानंतर प्रशासनाने खडबडुन जागे होत गेट दुरुस्ती केली मात्र,आजही गेट स्वयंचलीतच असल्याने सध्याची परीस्थीती पाहता गेल्या चार ते पाच दिवसापासुन राज्यभर संततधार पाऊस सुरू असल्याने त्यातच हवामान खात्याने अतिवृष्टी चा ईशारा दिला.इकडे मात्र, पैनगंगा नदिकाठचे शेतकरी धास्तावले आहेत.मागच्या वर्षीची पुनरावृत्ती झाली तर…यावर्षी सुध्दा जमीन आणि पिके वाहुन जातील. जिल्ह्यातील छोटे- मोठे तलाव पावसाने भरले आहेत.तर येळगाव धरण सुद्धा पाण्याने भरले आहे.

चिखली व बुलडाणा तालुक्यातील पैनगंगा नदिकाठचे येळगाव, सव, खुपगाव, किन्होळा, सवणा, सोमठाणा, दिवठाणा, पेठ, बेलदरी, बोरगाव, पांढरदेव, देवदरी, घानमोड, मानमोड, महिमळ, दहिगाव शिवारातील पैनगंगा नदिकाठावर शेती असलेले शेतकरी चिंतेत आहेत. यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात,सततधार पाऊस सुरु असल्याने येळगाव धरणावर कायमस्वरुपी कर्मचारी देण्यात यावेत, सांडव्यातील स्वयंचलीत गेट धरण भरण्यापुर्वी खुले ठेवण्यात येऊन पाण्याचा विसर्ग योग्य प्रमाणात झाल्यास शेतक-यांचे संभाव्य नुकसान टळु शकते. यासाठी त्वरीत उपाययोजना करण्याची मागणी चिखली तालुक्यातील शेतकर्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडुन जिल्हाधिकारी व मुख्याधिकारी बुलढाणा नगर पालीका यांच्याकडे दि.१३ जुलै रोजी करण्यात आली. यावर उपाययोजना न झाल्यास ; येळगाव धरणातील पुराच्या पावसाने शेतीपिकाचे नूकसान झाल्यास यास प्रशासन जबाबदार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.यासाठी वेळप्रसंगी तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावर्षी पैनगंगा नदिकाठच्या शेतकर्याचे नुकसान होणार नाही.यासाठी काळजी घेऊ व उपाययोजना करु असे अश्वासन प्रशासनाकडुन शेतकर्याना देण्यात आले आहे.

यावेळी विनायक सरनाईक, सतीश सुरडकर, नितीन शेळके, रविराज टाले, अनिल चौहाण, रामेश्वर चिकणे, प्रल्हाद देव्हडे यासह शेतकरी उपस्थीत होत.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129