
ताडशिवनी येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साह मध्ये साजरा
MH 28 News Live, सिंदखेड राजा : तालुक्यातील ताडशिवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व समता दल यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 15 आँगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा झाला.
यानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन करून ‘हरघर तिरंगा’ मोहीम गावात राबवण्यात आली. गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात प्रभात फेरी काढून परस्परांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयावर गावातील समस्त नागरिक, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय तिरंगा ध्वजाचे पूजन ह. भ. प. श्री काळे महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच आकाश खरात यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समता दलाचे भीमसैनिक व सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर मोजे ताडशिवणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे ध्वजपूजन काळे महाराज यांनी केले व ध्वजारोहण माजी सरपंच राजू शंकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी आशा स्वयंसेविका सामान्य नागरिक अंगणवाडी सेविका व सामान्य महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय या महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याप्रसंगी सरपंच आकाश खरात, उपसरपंच कैलास भूमकर
गावातील सामाजिक कार्यकर्ते सुशीलकुमार शिंदे, संजय बहादूरराव देशमुख, माजी सैनिक जाधव साहेब, वामन देशमुख, पंढरीनाथ शिंदे भाऊराव खरात, कंप्यूटर ऑपरेटर सुनील मुंडे, शिक्षक वृंद, महिला प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.