मनसे सवना शाखेची दहीहंडी जल्लोषात संपन्न
MH 28 News Live, चिखली : महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी दहीहंडी उत्सवासाठी अग्रगण्य असते सालाबादाप्रमाणे यावर्षी मनसेच्या सवना शाखेचा दहीहंडी उत्सव मोठ्या थाटामाटात जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे, उपजिल्हाध्यक्ष राजेश परिहार, जिल्हा सचिव योगेश काळे, उपतालुकाध्यक्ष संदीप नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
दहीहंडी उत्सवामध्ये गावातील विवीध पक्षांमध्ये असलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने गजानन भुतेकर, ज्ञानेश्वर कोलते, योगेश नवले, पवन पेटोले, गोपाल धुडकेकर, गणेश शिंदे, बद्री बनसोडे, उमेश ढोकणे,उमेश नरवाडे, ज्ञानेश्वर शेळके यांनी जिल्हाध्यक्ष गणेश बरबडे यांच्या नेतृत्वाखाली मनसेमध्ये जाहीर प्रवेश घेतला लवकरच संपूर्ण सवना गाव मनसेमय करणार असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली. नियोजित दहीहंडी उत्सवासाठी श्रीनाथ पवार शाखा अध्यक्ष, उमेश भुतेकर शाखा उपाध्यक्ष, पप्पू गाढवे विभाग प्रमुख, सचिन थिगळे सचिव, आकाश करवंदे, अनिल हाडे, संतोष पवार, प्रमोद पवार, स्वप्नील थिगले, अभी हाडे,अमोल सुरोशे यांनी अथक परिश्रम घेतले होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button