स्व. दयासागरजी महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून आ. श्वेताताई महाले यांचा शिक्षण क्षेत्रात प्रवेश
MH 28 News Live : चिखली : प्रशिक्षण महासंचालनालय DGT मान्यता प्राप्त तसेच नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग NCVT अंतर्गत जिल्हयातील युवक युवतींच्या हातात कौशल्य निर्माण करण्यासाठी आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या माध्यमातून चिखली तालुक्यातील उदयनगर येथे स्व.दयासागरजी महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे दालन परिसरातील युवक युवतींसाठी खुले झाले असून या संस्थेच्या माध्यमातून आ. श्वेताताई महाले यांचा शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी प्रवेश झाला आहे.
स्व.दयासागरजी महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची भव्य आणि दिमाखदार वास्तू उदयनगर येथील तोरणवाडा रस्त्यावर उभी झाली असून या सुसज्ज इमारत असलेल्या तसेच प्रॅक्टिकल साठी अत्याधुनिक सुविधां व नवीन तंत्र साधनांनी युक्त अशा या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमुळे परिसरातील वैभवात भर पडली आहे. स्व. दयासागरजी महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्था उदयनगर या ठिकाणी आतापर्यंत सर्वात जास्त रोजगार देणारे 4 ट्रेड सुरु करण्यात आले आहेत. इलेक्ट्रिशियन हा 2 वर्षाचा ट्रेड असुन ह्यात 40 जागा आहेत. फिटर हा 2 वर्षाचा ट्रेड असुन ह्यात 20 जागा आहेत. कोपा हा 1 वर्षाचा ट्रेड असुन ह्यात 48 जागा आहेत. सोलर टेक्निशियन हा 1 वर्षाचा ट्रेड असुन ह्यात 20 जागा आहे. पहिल्या दोन वर्षात स्व. दयासागरजी महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथून इलेक्ट्रिशियन आणि फिटरचे प्रशिक्षण घेतलेले 60 विद्यार्थी तर पहिल्या वर्षात कोपा व सोलर टेक्निशियन प्रशिक्षित 68 युवक युवतीं हातात रोजगारक्षम कौशल्य घेऊन बाहेर पडणार आहे.
सोलर टेक्निशियन हा ट्रेड केवळ स्व.दयासागरजी महाले ITI मध्येच
भविष्यात परंपरागत विजेची निर्माण होणारी टंचाई, त्यामुळे सोलर एनर्जीचे वाढती मागणी लक्षात घेता प्रशिक्षित सोलर टेक्निशियनची मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण होणार आहे. भविष्यात प्रत्येक घरावर मोफत वीज देणाऱ्या सोलरपासुन विज निर्मिती करणारे उपकरणे बसविल्या जाणार आहे. त्यामूळे सोलर टेक्निशियनची मोठ्या प्रमाणात मागणी वाढणार आहे . त्या दूर दृष्टीकोण ठेवून आ. श्वेताताई महाले यांनी
स्व. दयासागरजी महाले औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सोलर टेक्निशियन या ट्रेडला प्राधान्य दिले आहे. हा ट्रेड बुलडाणा जिल्ह्यातच नव्हे तर इतर जवळच्या चार जिल्हात सुद्धा उपलब्ध नाही..
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button