गणेशोत्सव विशेष – हत्तीच्या ऐवजी मानवाचे शीर असलेला एकमेव गणपती तुम्हाला माहीत आहे का ?
MH 28 News Live : सहसा गणपतीची मूर्ती म्हटली की मानवी शरीरावर हत्तीचे मस्तक असलेले चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहाते. मात्र, गणपतीला गजाचे मुख लावण्यापूर्वी म्हणजेच मानवी शीर असलेल्या रूपामध्ये गणपतीची मूर्ती असलेले मंदिर भारतात आहे. नेमके कुठे आहे ते मंदिर याविषयी जाणून घेऊया…
कसे आहे गणेशाचे स्वरूप ?
तामिळनाडूमधील तिरुवरुर शहरातील तिलतर्पणपुरी तीर्थाजवळच हे विशेष गणेशमंदिर आहे. पिता महादेवांनी गणेशाचे मानवी शीर धडापासून वेगळे करण्यापूर्वीचे हे गणेश रूप आहे. या गणेशाला आद्य गणेशही म्हणतात. गणेशाच्या या मूर्तीला चार हात असून चेहरा कार्तिकस्वामी यांच्यासारखा आहे. आपला उजवा पाय खाली सोडून ध्यानस्थ बसलेल्या स्वरूपात या गणेशाचे स्वरूप आहे. या गणेशाची खुद्द अगस्ती ऋषी हे दर संकष्टी चतुर्थीला आराधना करीत असत, अशी कथा आहे.
या मंदिरात श्रीरामचंद्रांचा सहवास
या मंदिराला श्री रामचंद्रांचा सहवास लाभला असल्याची आख्यायिका आहे. कथेनुसार, प्रभू रामचंद्र हे आपला पिता दशरथ यांचे श्राद्ध आणि पिंडदान करण्यासाठी आले. मात्र, पिंडदान केल्यावर त्या पिंडाच्या जागी किडे येवू लागले. पुन्हा-पुन्हा घडू लागले. शेवटी श्रीरामचंद्रांनी महादेवांची साधना केली.
श्रीरामांच्या कठोर साधनेवर प्रसन्न होत महादेव तेथे प्रकट झाले. त्यांनी मंथरावन येथे जाऊन श्राद्ध करावे, असे श्रीरामांना सांगितले. त्यानुसार, तत्कालीन मंथरावन येथे जाऊन श्रीरामांनी पिंडदान केले. श्रीरामांनी ज्या ठिकाणी पिंडदान केले होते, त्या ठिकाणी त्या चार पिंडांची चार शिवलिंगे तयार झाली. आजच्या काळातही ती शिवलिंगे पाहायला मिळतात.
तिलतर्पणपुरीचा अर्थ
हा भाग थेथे मुक्तिश्वर म्हणून ओळखला जातो. या कथेमुळे तिलतर्पणपुरी येथे जाऊन श्राद्ध करण्याची प्रथा आहे. गणेशाच्या मंदिरात धार्मिक विधी केले जातात तर बाजूच्या नदीत श्राद्धाचे विधी पार पडतात. तिलतर्पण या शब्दाचा अर्थ आहे समर्पण म्हणजे पितरांना समर्पित होणे असा अर्थ होय.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button