
एक तास राष्ट्रवादीसाठी… अभियानाला चिखलीत प्रतिसाद
MH 28 News Live, चिखली : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी एक तास राष्ट्रवादीसाठी – आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अनुशंगाने चिखली येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांनी पक्ष संघटन मजबुतीसाठी मनोगत व्यक्त करून नागरी समस्यांबाबत चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिखली विधानसभा अध्यक्ष प्रमोद पाटील, शहर अध्यक्ष रवींद्र तोडकर, प्रदेश प्रतीनिधी शंतनू बोंद्रे, युवा प्रदेश सरचिटणीस शेखर बोंद्रे, प्रशांत एकडे, युवक शहर अध्यक्ष सागर खरात, शहर उपाध्यक्ष प्रमोद चिंचोले, शेख युसुफ, शेख अनिस, निलेश जाटोळ, ओंकार तिडके, जावेद बागवान, यांच्यासह प्रभाग क्रमांक १ मधील नागरीक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत डोंगरदिवे तर आभार प्रदर्शन ओंकार तिडके यांनी केले.