♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

एसटी भरती प्रक्रियेसाठी मनसेचा विभाग नियंत्रकांना घेराव

MH 28 News Live, बुलढाणा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ २०१९ मधील सरळ सेवा भरतीची स्थगिती उठून सेवा पूर्व प्रशिक्षण पूर्ण झालेल्या उमेदवाराचे अंतिम वाहन चाचणी घ्यावी तसेच प्रशिक्षण बाकी असणार्‍या उमेदवाराचे प्रशिक्षण सुरू करावे या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा संघटक शैलेश गोंधणे यांच्या नेतृत्वात विभाग नियंत्रक स्वप्नील धनाड यांना घेराव घालण्यात आला.या प्रसंगी मनसे पदाधिकारी व म.रा.प. महामंडळाचे अधिकारी यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.

म.रा.प.महामंडळाच्या सन २०१९ च्या सरळ सेवा भरती प्रक्रिये संदर्भातील पात्र उमेदवारांच्या मागण्या व समस्ये साठी संबंधित उमेदवारांसह मनसे पदाधिकारी यांनी विभाग नियंत्रक रा.प .बुलडाणा यांना दि.२९ ऑगस्ट २०२२ रोजी घेराव टाकला त्यावेळेस विभाग नियंत्रक यांनी सेंट्रल ऑफिस मुंबई यांच्या पत्राचा दाखला देत सांगितले की, २८/ २०/२०२१ रोजी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आर्थिक काटकसरीच्या अनुषंगाने या भरतीला स्थगिती देण्यात आली आहे .जशी महामंडळीन प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने चालू होईल त्यावेळेस तुम्हाला घेण्यात येईल परंतु यावर उमेदवारांनी काही प्रश्न उपस्थित केले की ,जर सध्या स्थितीला महामंडळाची प्रवासी वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू नसेल तर महामंडळाला कंत्राटी चालकाची गरज का भासत आहे? आणि आपण तुमच्याजवळ प्रशिक्षित उमेदवार असल्यावर कंत्राटी चालक का घेताय? आणि या आर्थिक काटकसरीच्या अनुषंगाने महामंडळाला कंत्राटी कर्मचाऱ्याला २०,२१ हजार रु एवढा पगार देणे परवडत आहे का?ठेकेदार लोकांचे पोट भरण्यासाठी सुरू असलेले कंत्राटी चालक त्वरित बंद करण्यात यावे तसेच १६उमेदवार असे आहे की ते इतर विभागात कार्यरत होते परंतु त्यांची नियुक्ती या भरतीत झाली होती व विभाग नियंत्रक यांनी त्यांना त्यांचे विभागातून राजीनामे देऊन त्या त्या विभागाची ना हरकत घेऊन या असे सांगितले नंतरच आपल्याला या विभागात सेवेत घेण्यात येईल त्या नुसार १६ कर्मचाऱ्यांनी त्या त्या विभागात राजीनामे देऊन बुलढाणा विभाग नियंत्रक यांना ना हरकत देऊन सुद्धा आत्तापर्यंत त्यांना नियुक्ती देण्यात आल्या नाही यासंदर्भात विचारना केली असता सेंट्रल ऑफिसचे मार्गदर्शन घेऊन लवकरच योग्य तो निर्णय घेऊ असे विभाग नियंत्रक स्वप्नील धनाड यांनी मनसे पदाधिकारी व भरती पात्र उमेदवार यांना आस्वासित केले. आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हा संघटक शैलेश गोंधणे, मनविसे जिल्हाध्यक्ष शैलेंद्र कापसे, मनशेसे जिल्हाध्यक्ष प्रदीप भवर, शहर अध्यक्ष मनोज पवार, तालुका उपाध्यक्ष विजय पडोळ, मनविसे तालुकाध्यक्ष स्वप्निल आसोले, उप शहरअध्यक्ष शनिराज चौथे, संकेत काळे, उपतालुकाध्यक्ष अंकीत इंगळे, उपशहर अध्यक्ष तसेच इतर आणि सरळ सेवेतील भरतीतील पात्र उमेदवार सिद्धार्थ काकडे, दत्ता बुरंगे, संतोष जायभाये, नंदू पाटील, सचिन गवई, खंडागळे, सागर शेळके व इतर सर्व उमेदवार उपस्थित होते.

Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129