
दि चिखली अर्बन विद्यानिकेतन मध्ये बाप्पाचे ढोल ताशांच्या गजरात विसर्जन
MH 28 News Live, चिखली : गणेश चतुर्थी ज्या दिवशी गणपती बसल्यानंतर तिथून दहा दिवसानंतर अनंत चतुर्दशी असते. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चौदाव्या दिवशी अनंत चतुर्दशी साजरी करण्यात येत असते. ही आपण उत्साहात आणि आनंदाने साजरी करत असतो. सर्वजण मोठ्या उत्साहात आणि आनंदाने ढोल ताशांच्या गजरामध्ये गुलाल उधळत अनंत चतुर्दशीचा हा सण साजरा करीत असतो.
दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेमध्ये देखील गणपती बाप्पांचे विसर्जन मोठ्या उत्साहात व ढोल ताशांच्या गजरामध्ये व गुलाल उधळत करण्यात आले. या विसर्जनाच्या कार्यक्रमाला चिखली अर्बन बहुउद्देशीय संस्था चिखली यांचे सचिव माननीय डॉ. आशुतोष गुप्ता, शाळेच्या शैक्षणिक संचालिका डॉ. पूजा गुप्ता व शाळेचे प्राचार्य गौरव शेटे उपस्थित होते.
मुलांमध्ये देशभक्ती जागृत राहण्यासाठी गणेश उत्सवाची कारगिल युद्धावर आधारित सजावट करण्यात आली होती व दररोज आरती, गणेश पूजनासाठी माजी सैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते.
गणपती उत्सवाच्या दरम्यान वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. जसे रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, संगीत खुर्ची, चित्र रंगवणे, डाळी पासून गणपती बनवणे अशा खूप सार्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक वर्गाला आरती करण्याची संधी देण्यात आली.
अशाप्रकारे दि. चिखली अर्बन विद्यानिकेतन शाळेमध्ये गणपती उत्सव साजरा करण्यात आला व अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन करण्यात आले.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button