♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मेहकर मतदारसंघातील ग्राम स्तरावरील विविध योजनांकरिता झाली आढावा व मार्गदर्शन सभा

MH 28 News Live, डोणगाव : सध्या दिनांक एक ऑगस्ट 2022 रोजी पासून मतदान कार्डाला आधार लिंक करण्याबाबतचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगामार्फत घोषित करण्यात आला आहे. या निवडणुक कार्यक्रमानुसार प्रत्येक मतदाराला आपले मतदार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे म्हणजेच आपले मतदान कार्ड आधार कार्डला लिंक करणे आवश्यक आहे. आपले मतदान कार्ड आधार कार्ड लिंक करण्यासाठी आयोगामार्फत विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामध्ये स्वतः मोबाईल मधून वोटर हेल्पलाइन नावाचे ॲप्लिकेशन घेऊन किंवा आपल्या गावाच्या बीएलओ यांना भेटून आपण आपले मतदान कार्ड आधार कार्डशी लिंक करू शकता तसेच दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी पर्यंत ज्या तरुणांनी त्यांच्या वयाची 18 वर्षे पूर्ण केली असतील अशा सर्व व्यक्तींनी आपले नाव मतदार यादी मध्ये नोंदणी करून घ्यावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी व मतदार नोंदणी अधिकारी गणेश राठोड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून केले.

मेहकर तहसील कार्यालयात दि. १५ सप्टेंबर रोजी आयोजित या बैठकीस प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर संजय गरकल तहसीलदार मेहकर यांनी आपली भूमिका पार पाडली. या कार्यक्रमाकरिता ग्राम स्तरावर काम करणारे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी व त्यासोबत पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. याप्रसंगी उत्कृष्ट काम करणाऱ्या एन. एस. बोरकर, राजेंद्र आव्हाळे, गजानन ढोके या पर्यवेक्षकांचा गौरव करण्यात आला. महसूल सहाय्यक प्रवीण परमाळे यांनी मतदारांना स्वतः त्यांचे मोबाईल मधून वोटर हेल्पलाइन ॲप द्वारे कसा अर्ज भरावा याबाबत माहिती दिली

सदरील कार्यक्रमाकरिता ग्राम स्तरावर काम करणारे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक पोलीस पाटील कोतवाल इत्यादी कर्मचारी उपलब्ध होते. निवडणूक विभागाचे रामचंद्र नवघरे, डेटा एन्ट्री ऑपरेटर प्रभाकर शेळके महसूल सहाय्यक यांचे विशेष सहकार्य लाभले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129