
पीकांच्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ आर्थिक मदत द्या, अन्यथा आंदोलन – जळगाव जामोदमध्ये शेतकऱ्यांचा इशारा
MH 28 News Live, जळगाव जामोद : गेल्या तीन-चार दिवसापासून संपूर्ण राज्यात संतत धार पाऊस चालू असून जळगाव जामोद तालुक्यातील या पावसाने शेतकऱ्यांचे पिकांचे चांगलेच नुकसान केलेले आहे. यामध्ये काही भागातील जमिनी ह्या पिकांसह खरडुन गेल्या त्यामध्ये सोयाबीन ,तूर, कपाशी आदी काही पिके जमीन दोस्त झाली. तर नदीकाठील विहिरी ह्या पूर्णपणे खसलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात नैराश्याचे वातावरण तयार झालेले आहे. तरी शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करता या झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकाचे व नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊन दिलासा द्यावा अन्यथा शेतकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा दिला आहे.
तहसीलदार यांच्याकडे स्थानिक शेतकरी व भूमित्रांच्या वतीने पीकांच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी निवेदन सादर करण्यात आले. यावेळी अक्षय पाटील, अश्पाक देशमुख, वैभव जाणे, आकाश आटोळे, अजय गिरी, अनंता पारस्कार, शुभम रोठे, ज्ञानेश्वर पाटील, विजय तिजारे, विजय रोठे, सतीश निंबाळकर, विजय वंडाळे, गजानन मानकर, सदाशिव जाणे, अवी पाटील, योगेश पोटे, अनिल गायकवाड, अतुल गायकवाड, महेश पारसकर, मोहन पारस्कर, प्रमोद गवई, अतुल गवई तसेच तालुक्यातील बहुसंख्या शेतकरी उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button