
डोणगांवात रहेमत नगरमध्ये स्ट्रीट लाईट साध्या वायरवर; नागरीकाचा जीव धोक्यात
MH 28 News Live, डोणगांव : येथील ग्रामपंचायतने रहेमत नगरमध्ये नागरीकांना प्रकाश मिळावा म्हणून प्रत्येक खांबावर एल. ई. डी बल्ब बसवले. परंतु सदर भागात ग्रामपंचायतचे बल्ब लावण्यासाठी तिसरा तार उपलब्ध नसल्याने ग्रामपंचायतने चक्क साधा सरळ वायर खांबावर टाकुन प्रत्येक पोलवर कनेक्शन नेऊन बल्ब लावले. मात्र सदर वायर हा ठिकठिकाणी जॉईट मारलेला त्याच बरोबर लोंबकळत ठेवून नागरीकांच्या जीवास धोकादायक ठरत आहे.
कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, मुरलीधर लांभाडे, अमोल धोटे, ग्रामपंचायत उपसरपंच श्याम इंगळे व सदस्य संजय जमधाडे तसेच सैय्यद नुर अतार हे रहमत नगरमध्ये फिरल्यानंतर उघडकीस आला. अशाप्रकारे ग्रामपंचायतने सदर साधा वायर टाकून बल्ब सुरू केल्याने एखाद्या अपघात किंवा विजेचा धक्का लागल्यास याला जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यांनी प्रकाराची चौकशी करण्याची मागणी मागणी मुरलीधर लांभाडे संजय जमधाडे यांनी केली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button