♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

मित्रानेच धाडले मित्राला यमसदनी… दे. माळी येथील सुधाकर इंगोले यांचा अपघात नसून हत्या

MH 28 News Live, मेहकर : जुन्या वादातून आपल्या साथीदाराच्या सहकाऱ्याने जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना २५ सप्टेंबर रोजी घडली होती. यावेळी जखमी अवस्थेत सुधाकर इंगोले यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. सुधाकर यांचे चुलत भाऊ गजानन रामदास इंगोले यांनी ३० सप्टेंबर रोजी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी बुलढाणा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या राजीव लहाने याच्यासह ३ आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी राजीव लहाने ह्याला अटक करण्यात केली अशी माहिती ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्याकडून मिळाली आहे. दरम्यान औरंगाबाद येथे सुधाकर इंगोले उपचारादरम्यान २ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला आहे.

 

यासंदर्भात थोडक्यात माहिती अशी आहे की, देऊळगाव माळी येथील मुळ रहिवासी व सध्या बुलढाणा शहरातील सरस्वती नगर येथे राहणारे ५० वर्षीय सुधाकर लक्ष्मण इंगोले हे आगोदर जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत होते. सध्या लोणार ग्रामीण रुग्णालयात त्यांची बदली झालेली होती. जिल्हा रुग्णालयात कार्यरत राजीव लहाने व सुधाकर इंगोले अनेकवेळा दोघेही सोबत जेवायला जात होते. २५ ऑक्टोबर रोजी स्थानिक धाड नाक्यावर सुधाकर इंगोले हे जखमी त्याच्या डोक्याला मार लागलेल्या अवस्थेत आढळल्याने प्रथम बुलढाणा शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. नंतर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. उपचारादरम्यान 2 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गजानन इंगोले यांच्या तक्रारीवरून वरून बुलडाणा शहर पोलिसांनी आरोपी राजीव लहाने व त्यांच्या २ सहकाऱ्यांविरुद्ध कलम ३०७ भादवी ३४ नुसार खुणाचा गुन्हा दाखल करून आरोपी राजीव लहाने यास अटक केली आहे. पुढील तपास ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहे. अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129