नाशिकच्या अपघातात आगीत होरपळून बिबी येथील आजी व नातीचा मृत्यू
MH 28 News Live, लोणार : आज सकाळी नाशिक येथील औरंगाबाद रोडवर मिरची हॉटेल जवळ ट्रॅव्हल्स बस आणि आयशर ट्रकची समोरासमोर धडक झाल्यामुळे बसने पेट घेतला त्यात १२ प्रवाशांचा मृत्यू झाला. या गाडीतून प्रवास करणाऱ्या बीबी येथील आजी व एका नातीचा देखील मृतकांमध्ये समावेश असून दुसरे नात आणि नातू जखमी झाले आहे.
बीबी येथील लक्ष्मी बाई नागोराव मुदलकर यांना मुबंई येथील ठेकेदार यांचा फोन आल्यामुळे त्या आपले पायल रमेश शिंदे ( ७ वर्ष ) आकाश मुदलकर (५ वर्ष ) कल्याणी आकाश मुदलकर (३वर्ष ) यांना घेऊन लक्ष्मी लक्ष्मी बाई नागोराव मुदलकर हया चिंतामणी ट्रॅव्हल्स च्या पुसद मुबंई लक्झरी ने दिनांक ८ ऑक्टोंबर २०२२रोजी रात्री साडे दहा पावणे अकरा वाजे दरम्यान त्या मुबंई साठी रवाना झाल्या होत्या. त्यांना तीन मुले एक मुलगी असून ते मुबई येथे मजुरीचे काम करतात. नाशिक ला झालेल्या या घटनेत लक्ष्मी बाई नागोराव मुदलकर व कल्याणी आकाश मुदलकर यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला तर पायल रमेश शिंदे आणि चेतन आकाश मुदलकर हे गंभीर जखमी झाले आहेत.
अचानक झालेल्या घटनेमुळे बीबी येथील मृताचे नातेवाईक नाशिक कडे रवाना झाले आहेत. या घटनेमुळे बीबी सह लोणार तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button