
युपीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारुन प्रियंकांनी द्यावा पदाचा राजीनामा. निलंबित प्रदेश प्रवक्त्याने केली मागणी
MH 28 News Network : नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खाल्लेल्या काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे मोठी मंथन बैठक पार पडली. या बैठकीत गांधी कुटुंबातील शीर्षस्थ नेते राजीनामा देणारे असल्याची हवा तयार झाली होती. परंतु, प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. उलट पाचही राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना पदावरून हटवण्यात आले. मात्र आता काँग्रेसच्या उत्तर प्रदेश प्रभारी व गांधी कुटुंबातील प्रियंका वाड्रा यांच्याविरुद्ध जाहीर असंतोष पक्षातून व्यक्त झाला असून उत्तर प्रदेशातील निलंबित प्रदेश प्रवक्त्याने थेट प्रियंका वाड्रा यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने काँग्रेस मध्ये मोठी खळबळ उडाली आहे
काल प्रथमच जाहिररीत्या महासचिव प्रियांका गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे निलंबित प्रवक्ते जीशान हैदर यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहुन प्रियांका गांधी यांचा उत्तर प्रदेश प्रभारी पदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे. आपल्या पत्रात हैदर म्हणातात, पराभावाचे संपूर्ण खापर प्रदेशाध्यक्षांवर फोडणे चुकीचे आहे. कारण राज्यातील सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना माहित आहे की प्रभारी जर स्वतः प्रियांका असतील तर प्रदेशाध्यक्ष स्वतःच्या मर्जीने साध्या शिपायाची देखील नेमणूक करु शकत नाहीत.
हैदर यांनी या पत्रात २०१२ ला दिग्विजय सिंह, रिटा बहुगुणा जोशी, २०१७ मध्ये गुलाम नबी आझाद, राज बब्बर यांनी राजीनामा दिल्याची आठवण करुन दिली आहे. त्यामुळे आता सर्वांना समान न्याय प्रमाणे प्रियांका गांधी यांनीही राजीनामा द्वावा अशी मागणी केली आहे. हैदर यांच्या या पत्रामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली असून राहुल गांधींपाठोपाठ आता प्रियंका गांधीही निशाण्यावर आल्या आहेत. हैदर यांचे मागील आठवड्यात काँग्रेस पक्षातून निलंबन करण्यात आले आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button