
बाळासाहेब देवरस विद्यामंदिरातर्फे प्रज्ञा घेवंदे हीचा सत्कार
MH 28 News Live, चिखली : स्थानिक बाळासाहेब देवरस प्राथमिक विद्यामंदिर चिखली येथे शाळेची माजी विद्यार्थिनी कु. प्रज्ञा संतोष घेवंदे हीचा सत्कार करण्यात आला.
प्रज्ञा हीची नुकतीच इंडियन नेव्ही मध्ये निवड झाली. चिखली तालुक्यातून भारतीय नौदलात प्रथमच महिला एस एस आर म्हणून निवड झाल्याबद्दल व आय. एन. एस. चिल्का, ओडिसा येथे प्रशिक्षणासाठी जात आहे त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड. मंगेश व्यवहारे,सचिव सुदर्शन भालेराव,कोषाध्यक्ष नारायण खरात, सत्यनारायण लड्डा, नारायण भवर, धनंजय व्यवहारे, शार्दुल व्यवहारे यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी तिच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तसेच तिला संस्थेकडून आर्थिक मदत करण्यात आली. या विद्यार्थिनीची जिद्द, चिकाटी व मेहनतीवृत्ती ओळखून संस्थेचे अध्यक्ष , संचालक मंडळ व शाळेच्या शिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून तिने ठरवलेले ध्येय गाठण्यासाठीचे बाळकडू शाळेतच देण्यात आले.त्यामुळेच तिला हे यशाचे शिखर गाठता आले म्हणून तीनेसुद्धा संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ व शाळेचे शिक्षक यांचे आभार मानले. प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, संचालक मंडळ तसेच शाळेचे मुख्याध्यापक व समस्त शिक्षक वृंद यांची प्रामुख्याने उपस्थित होती.