♦इस खबर को आगे शेयर जरूर करें ♦

चिखलीत उध्दव ठाकरे यांचा शेतकरी संवाद मेळाव्याला लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे- खा. विनायक राऊत

MH 28 News Live, चिखली : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी, शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रभर विविध ठिकाणी संवाद सभा घेण्याचा निर्णय घेतला असून त्यानूसार दि. २६ नोव्हेंबर रोजी चिखली येथे क्रीडा संकुलाच्या मैदानावर आयोजित शेतकरी संवाद मेळावा विक्रमी होणार असल्याचे खा. विनायक राऊत यांनी काल दि. २२ नोव्हेंबर रोजी प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या रायगड या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत केले.

यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, माजी जिल्हा प्रमुख धीरज लिंगाडे, उपजिल्हाप्रमुख कपील खेडेकर, तालुकाप्रमुख श्रीकिसन धोंडगे, शहर प्रमुख श्रीराम झोरे, माजी नगरसेवक दत्ता सुसर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना त्यांनी हे घटनाबाह्य सरकार असून या सरकारने फक्त घोषणांचा पाऊस पाडून पाडून शेतकऱ्यांना अक्षरक्षः नागवल्याचा आरोप केला. शेतकर्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि या घटनाबाह्य सरकारल बठणीवर आणण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या घोषणेनूसार पहिली सभा मातृतिर्थं बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे आयोजित केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि सोयाबीन तथा कपाशीला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांपूढे जगावे कसे ? हा प्रश्न निर्माण झालेला असतांना करत असल्याचे देखिल त्यांनी सांगितले.

बुलढाणा जिल्ह्यावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कायम प्रेम राहिलेले आहे. आणि या जिल्ह्याने देखिल शिवसेनेला भरभरुन दिल्याने दौऱ्याच्या सुरुवातीलाच शेतकरी संवाद मेळाव्यासाठी चिखलीचीच निवड केली असल्याचे खा. राऊत म्हणाले.

पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीसंदर्भात प्रश्नाला उत्तर देतांना त्यांनी लवकरच याबाबतीत निर्णय होवून कार्यकत्यांच्या मनात असलेली शिवशक्ती भिमशक्ती एकत्रित यावी ही कार्यकत्यांची इच्छा आहे. त्यांच्या भावनेचा नक्कीच आदर करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. घटनाबाह्य सरकार सतत शिवसैनिकांवर खोट्या केसेस करणे, दडपशाहीचा वापर करणे, तसेच शिवसेनेच्या पदाधिकार्यांवर हल्ले घडवून आणत आहे. यापूढे असले अन्याय केला, कितीही खोट्या केसेस केल्या तरी निष्ठावान शिवसैनिक हे शिवसेनेसोबतच राहणार यात कुठलीही देतांना सांगितले. शंका नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले, न्यायालयावर आमचा विश्वास असून न्यायालयाच्या निर्णयानंतर हे सरकार पायउतार होणार असल्याचे सेना नेते खा. विनायक राऊत पत्रकारांशी वार्तालाप करतांना सांगितले.

व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें

Please Share This News By Pressing Whatsapp Button




स्वतंत्र और सच्ची पत्रकारिता के लिए ज़रूरी है कि वो कॉरपोरेट और राजनैतिक नियंत्रण से मुक्त हो। ऐसा तभी संभव है जब जनता आगे आए और सहयोग करे


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles

Close
Close
Website Design By Bootalpha.com +91 84482 65129