ऐन हिवाळ्यात तापले ग्रामपंचायतीचे राजकारण. ३७ मतदानकेंद्रावर ३८ हजार ४४७ मतदार निवडणार २८ सरपंच तथा २२२ सदस्य
MH 28 News Live, चिखली: ग्रामीण भागातील विकासाचा कणा असलेल्या २८ गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणूक जाहीर झाली आणि गावागावातील गावपुढार्यांमधे निवडणूकीची धामधूम सुरु झाली.ऐन हिवाळ्यात आलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीने आता चांगलेच राजकारण तापल्याचे बघायला मिळत आहे.
पँनल टाकण्याची तयारी सुरू झाली असुन तयारी सुरू झाली असुन प्रमुख राजकीय पक्षांचा हस्तक्षेप वाढत असल्याने यावेळी किती ग्रामपंचायती अविरोध होणार याकडे लक्ष लागले आहे.
राजकारणात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या या निवडणूकीची तयारी गावपातळीवर मोठ्याप्रमाणावर सुरु असुन अर्ज भरण्याच्या तयारीला आता कागदपत्रांची जुळवाजुळव करतांना भावी सरपंच तथा सदस्य दिसुन येत आहे.गत अनेक वर्षापासून ग्रामीण भागात असलेल्या समस्या कायम असुन या सोईसुविधा पुरविण्या साठी काही अपवाद सरपंच सोडले तर बरेच सरपंच अपयशी ठरल्याचे दिसुन येत आहे.असे असतांना देखील या निवडणूकीमधे खुट आणि भावबंध याच मुद्यावर निवडणूका होत असल्याचे दुर्दैवी चित्र बघावयास मिळत आहे.आजही ग्रामीण भाग मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत असुन नेहमीच येतो पावसाळा या प्रमाणे नेहमीच येतात निवडणूका असे म्हणनं वावग ठरणार नाही.केवळ वैयक्तिक प्रतिष्ठेसाठी लढल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतुन गावाचा विकास हा विषय कधीच पटलावर नसतो.गावकरी देखील निवडणुक आल्यावरच गावात सक्रिय रहातात आणि नंतर आपापल्या कामामधे व्यस्त होतात.याच परिस्थितीत ग्रामीणभाग विकासा पासुन मात्र कोसो दुर रहालेला आहे.
२०१६ पासून ग्रामीण भाग हागणदारीमुक्त करण्याचे काम युध्दपातळीवर हाती घेण्यात आले होते त्यानंतर तालुकातील जवळपास गावे कागदावर हागणदारीमुक्त झाले देखील मात्र अद्यापही काही गाव सोडले तर सर्वच गावांमधे हागणदारी कायम असल्याचे विदारक चित्र आहे.तसेच अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या तसेच नाल्या अंतर्गत रस्ते,पथदिवे यासारख्या समस्या कायम आहेत.अशा परिस्थितीमध्ये या निवडणूकीमधे गावाचा विकास हा मुद्दा असावा असी सामान्य नागरीकांची अपेक्षा असली पाहिजे.परंतु सदस्य तथा सरपंच पदाचे उमेदवार निवडतांना मात्र खुट आणि ज्यांना अगोदर पद मिळाले नाही असे निकस गावकरी लावत असल्याने अनेक गावामधे ज्यांचा राजकारणाशी काहीच संबध नाही फक्त आपल्या घरात ग्रामपंचायतीचे पद मिळाले नाही ते मिळावे अशी प्रतिष्ठा जपण्यासाठीच त्या पदावर जातात.पुढे मात्र गावाच्या समस्या आणि हे निवडुन आलेले सदस्य यांचा काहीच संबंध रहात नाही.
त्यामुळे या निवडणुकीमध्ये तरी ज्यांना विकासाची जाणिव आहे आणि गावासाठी गावातील नागरिकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काम करावयाचे आहे अशांनीच यामधे भाग घ्यावा आणि गावकऱ्यांनी आपला लोकप्रतिनिधी निवडावा अशी माफक अपेक्षा व्यक्त होत आहे.
२८ ग्रामपंचायती साठी ८७ मतदान केंद्र
८७ हजार ४४७ मतदार करणार मतदान….
तालुक्यातील २८ ग्रामपंचायती साठी २८ सरपंचांची जनतेतून निवड होणार असुन २२२ ग्रामपंचायत सदस्य निवडल्या जाणार आहे.यासाठी २० हजार ५३ पुरुष तथा १८ हजार ३९४ स्रिया मतदान करणार आहेत.२८ नोव्हेंबर पासून अर्ज भरण्याची सुरवात होणार असुन २ डिसेंबर ही शेवटची रहाणार आहे.छाननी दि.१२ डिसेंबरला तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ७ डिसेंबर आहे.दि.१३ डिसेंबरला मतदान होणार असुन दि.२० डिसेंबरला निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.यासाठी ९ निवडणूकअधिकारी तसेच ९ सहाय्यक निवडणूकअधिकारी नेमण्यात आलेले आहेत.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button