मासरुळ कालवा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करण्याची आ. श्वेताताई महाले यांच्या सूचना
MH 28 News Live, धाड : मासरुळ कालवा अनेक वर्षापासून नादुरुस्त असल्याने मासरुळ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पूर्ण क्षमतेने सिंचन होत नाही. मासरुळ येथील पद्मावती धरणावरून 560 हेक्टर सिंचन होणे अपेक्षित असताना कालवा दुरुस्ती नसल्याने केवळ 110 हेक्टर एव्हढेच सिंचन होत आहे. याचाच अर्थ 450 हेक्टर जमीन सिंचनापासुन वंचीत राहून शेतकऱ्यांचे पीक उत्पादन घटत आहे. त्यामुळे मासरुळ कालवा दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करून तातडीने कालवा दुरुस्ती करण्याच्या सूचना आ सौ श्वेता ताई महाले पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना सिंचनासाठी पाणी सोडण्याच्या कार्यक्रमावेळी दिली.
दि 16 डिसेंबर रोजी मासरुळ येथील पद्मावती धरणाचे कालव्या व्दारे आ सौ श्वेता ताई महाले पाटील यांच्या हस्ते पाणी सोडण्याचा शुभारंभ करण्यात आला. चिखली मतदारसंघातील लोकप्रिय आमदार श्वेता ताई महाले यांनी मासरूळ लपा प्रकल्पावर भेट दिली त्यांचे मार्फत मासरुळ लपा प्रकल्पाचे रब्बी हंगामातील सिंचना करिता कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले.
यावेळी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता एम बी मिरकुटे व कर्मचारी तसेच पाटावरील लाभ क्षेत्रातील शेतकरी उपस्थित होते. पाटा चे पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाल्यामुले व त्यावरील बांधकामांची तुटपुट झाल्यामुळे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवणे शक्य होत नाही . पाटाची दुरुस्ती व धरणावरील झाडे झुडपे काढण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांकडून करण्यात आली.
यावेळी ॲड सुनील देशमुख शहराध्यक्ष भाजप, प्रकाश पाटिल पडोळ जिल्हा उपाध्यक्ष किसान आघाडी, विष्णू वाघ तालुका उपाध्यक्ष भाजपा, देवेंद्र पाय घन तालुका उपाध्यक्ष भाजपा,शरदराव देशमुख अर्जुन लांडे पाटील जिल्हा सचिव भाजप रामेश्वर आल्हाट दिव्यांग आघाडी अध्यक्ष कलयाणराव देशमुख ज्येष्ठ नेते देवराव भाऊ कापरे दीपक गुळवे गजानन भाऊ आत्माराम वाघ अरुण बोडखे गणेश बोडके संतोष भगत श्रीराम पवार नारायण साळवे गुलाब शिंदे व समस्त भाजप पदाधिकारी मासरूळ आणि बहु संख्य शेतकरी उपस्थित होते.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button