
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता खरात यांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश
MH 28 News Live, चिखली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खा. प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चिखली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस नेते व समता परिषद जिल्हाअध्यक्ष दत्ता खरात यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा समता परिषदेचे बुलडाणा जिल्हाअध्यक्ष दत्ता खरात यांनी खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय रायमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थिती बाळासाहेबांची शिवसेना या पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी दत्ता खरात यांचे मन:पूर्वक अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी एकनिष्ठ राहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती घेतलेल्या विकास कार्यात सहभागी होण्यासाठी आपण खासदार प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळात पक्षबांधणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करु व पक्षाकडून सोपवली जाणारी कामगिरी चोखपणे बजावू अशी प्रतिक्रिया दत्ता खरात यांनी आपल्या पक्ष प्रवेशासंदर्भात MH 28 News Live शी बोलताना व्यक्त केली.