ॲट्रॉसिटी प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी उपोषणाचा इशारा
MH 28 News Live, लोणार : तालुक्यातील आदिवासीबहुल टिटवी या गावातील दोघा भावंडांवर चौघांनी प्राणघातक हल्ला केला. या आरोपींविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्यासह अँट्रॉसिटी व विविध गुन्हे दाखल असताना पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केली नाही. पोलिसांचे अभय असल्यानेच आरोपी पाच महिन्यांपासून मोकाट असल्याचा आरोप तक्रारकर्ते निवृत्ती चिभडे व संतोष चिभडे यांनी केला आहे.
२८ डिसेंबर२०२३ पर्यंत आरोपींना अटक न केल्यास २ जानेवरी २०२२ पासून पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा पीडितांनी दिला आहे. टिटवीचे रहिवासी निवृत्ती किसन चिभडे व संतोष निवृत्ती चिभडे या भावंडांवर धोंडू हाकम राठोड, सुदाम धोंडू राठोड, सोपान धोंडू राठोड व कृष्णा धोंडू राठोड यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या प्रकरणी लोणार पोलिसांत तक्रार दिल्यानंतर भादंवि कलम ३०७, ३४१, १४३, १४७, १४८, १४९, ३२३ तसेच ॲट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, गुन्हे दाखल झाल्यापासून पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही. या उलट आरोपी रात्रीच्या वेळी पीडितांच्या घरावर दगडफेक करतात. त्यांना प्रत्यक्ष भेटून जीवे मारण्याच्या धमक्या देतात. गुन्हे मागे घेण्यासाठी दबाव टाकतात, असे निवृत्ती चिभडे यांनी पोलीस प्रशासनावर आरोप केला आहे यांनी जिल्हा पोलीसअधीक्षकांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. २८ डिसेंबर २०२२पर्यंत आरोपींना अटक न झाल्यास २ जानेवारी २०२३पासून बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा चिभडे भावंडांनी दिला आहे.
व्हाट्सप्प आइकान को दबा कर इस खबर को शेयर जरूर करें
Please Share This News By Pressing Whatsapp Button