
भूमी मुक्ती मोर्चा २८ डिसेंबरला धडकणार नागपुरच्या हिवाळी अधिवेशनावर
MH 28 News Live, उदयनगर : भूमी मुक्ती मोर्चाचा हिवाळी अधिवेशनावर २८ ला मोर्चाआपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी भूमी मुक्ती मोर्चा व बहुजन मुक्ती मोर्चा तर्फे येत्या २८ डिसेंबर रोजी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा संयुक्त संघटनेचे प्रमुख भाई प्रदीप अंभोरे यांच्या नेतृत्वात संघटना प्रदेशाध्यक्ष भिमराव खरात, लक्ष्मण ठोसरे यांच्यासह राजाराम बल्हाल संस्थापक म ब से पुणे, महादेव वरठे म गा धा संघ, बाबुराव सरदार राज्य प्रवक्ते प्रकाश वानखेडे, उत्तर महाराष्ट्र, मुन्ना पराते, दिलीप रामटेक कर नागपूर विभाग,भगवान गवई मराठवाडा,रमेश गाडेकर विदर्भ रवींद्र उमाळे पछिम म.मनोहर खोत कोल्हापूर ब्रम्हांद नवघरे वाशिम प्रभाकर वकोडे मधुकर मिसाळ अम. वि. च्या मार्गदर्शनात निघणार आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई प्रदीप अंभोरे यांनी जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नागपूरचे पोलीस आयुक्त यासह संबधितांना मोर्चाचे लेखी निवेदन पाठविले आहे. सर्वोच्च न्यायलय निर्णय प्रमाणे भूमिहीनांना २८ नोव्हेंबर १९९१ च्या निर्णयानुसार कायम पट्टे वाटप बाबत शासनाने विधान सभेत घोषणा करून पट्टे देण्यात यावे, राज्य शासनाने राज्यातील भूमिहीनां साठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागावी. राज्यातील शेतकऱ्या प्रमाणे राज्यातील भमिहिनानाची १००/ टक्के कर्जमुक्ती घोषणा करा,राज्य शासनाने २०११ चा शासन निर्णय रद्द करावा, शेतकऱ्यांची पीक विम्याची रक्कम तात्काळ देण्यात यावी, शेतकऱ्यांच्या मालाला सोयाबीनसह हमी भाव मिळावा, वन जमीन प्रलंबित वन दावेदारा च्या ताब्यातील व गायरान महसूल जमीन नी वरील उभ्या पिकांना राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करून उभे पिके व घरे उध्वस्त न करता संरक्षण करा.गावं ठणा तील जमिनीवर रमाई व पंतप्रधान योजनेची घरकुलास २.५० लक्ष अनुदान करा व बांधण्यास परवानगी द्या, वडार समाजाला गौण खनिजाची रायल्टी मंजूर करावी, उदयनगर येथील चिखली खामगाव १६ कोटी प्रस्तावित महामार्ग रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाची सुरुवात तात्काळ करावी, जिगाव पेनटाकळी प्रकल्प बाधितांना शासकीय १८ सुविधा प्रदान करा प्रकल्प ग्रस्तांना दिलेल्या जमिनि ईतकी पर्यायी जमीन घरे देण्यात यावी आदी १७ मागण्यासाठी नागपूर येथे हा मोर्चा काढण्यात येणार आहे. यशवंत स्टेडियम धंतोली नागपूर येथून दुपारी १२ वाजता निघणारा हा मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यासह अकोला, जळगाव, औरंगाबाद, नागपूर ,वाशिम व अमरावती येथील संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी व अतिक्रमणधारक बांधवांनी या मोर्चात प्रचंड संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदेशानुसार संघटना जिल्हा नेते गजानन जाधव शेषरावचव्हाण, अशोक इंगळे प्रमोद पोहेकर, सुभाष घुगे, भारत मुंडे बुलडाणा, कैलास हिवराळे अकोला माधव अवले वाशिम अनिस खान पठाण, निलेश बाभुळकर, लुकमन भाई, लाला सपकाळ गजानन चिंचोले, ज्ञानदेव मिसाळ, गोपाळ अहिरे, सारंगधर वाकोडे रामेश्वर चव्हाण यांनी केले आहे